सूर्योपासना:संपूर्ण आरोग्याची नांदी’ पुस्तकाचे ५ जून रोजी प्रकाशन

IMG-20220602-WA0094
‘सूर्योपासना:संपूर्ण आरोग्याची नांदी’ पुस्तकाचे ५ जून रोजी प्रकाशन

पुणे :’सूर्योपासना:संपूर्ण आरोग्याची नांदी’ या निखिल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन ५ जून रोजी पुण्यात होणार आहे.विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी ) मराठी विभागातर्फे प्रकाशित या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता होणार आहे. रामजन्मभूमी न्यासाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज हे प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान, भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत.विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट, विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.*सूर्यनमस्कारांची चिकित्सा करणारे लेखन*निखिल कुलकर्णी हे सूर्यनमस्कार अलायन्स या संस्थेतर्फे कॅलिफोर्नियाच्या बे एरियात गेली दोन-अडीच दशके सूर्यनमस्काराचा प्रचार-प्रसार करतात. लॉकडाऊनच्या काळात सूर्यनमस्कारांची योगिक-शारीरिक-वैद्यकीय चिकित्सा करणारे काही लेख निखिल कुलकर्णी यांनी सोशल मिडियावर लिहिले होते. त्या व आणखी काही नव्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे………….

Latest News