पिंपरी चिंचवड शहरांची राष्ट्रवादी काँग्रेस 600 पदाधिकाऱ्यांचीं जम्बो. कार्यकारणी उद्या जाहीर होणार

नवीन शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष आणि युवक शहराध्यक्ष १२ फेब्रुवारीला दिले.आता त्यांची नवी कार्यकारिणी उद्या जाहीर केली जाणार आहे. ती सर्वसमावेशक व्हावी म्हणून त्यात अजितदादांनी दोनदा बदल केल्याचे समजते. ही कार्यकारिणी आधीपेक्षा मोठी म्हणजे सहाशेची असणार आहे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांची आधीची कार्यकारिणी पाचशेची होती. मात्र, वाघेरेंच्या अध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने आणि गेलेली महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळविण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने शहरातील भाकरी फिरवली.
. त्यापासून बोध घेत आताप्रभाग आणि वॉर्ड रचनेवर भर देण्याचे ठरवले आहे. प्रभाग तथा वॉ़र्ड सक्षमीकरणावर भर देणारी सहाशे जणांची जंबो शहर कार्यकारिणी राष्ट्रवादीकडूनउपस्थितीत उद्या (ता.३) जाहीर केली जाणार आहे.
`आरएसएस`च्या बूथ बळकटीकरणाच्या रणनीतीला जशास तसे उत्तर देण्यासाठी आणि पिंपरी महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. भाजपला जशास तसे उत्तर नव्या शहर कार्यकारिणीतून देण्याचे राष्ट्रवादीने ठरविले असल्याचे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने केल्यानंतर अजित पवार पक्षाचा मेळावा उद्या दुपारी घेणार आहेत
. त्यात ते त्यात आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे समजते.पूर्वीच्या कार्यकारिणीत बहुतांश सेलचे अध्यक्ष मराठा होते. त्यामुळे यावेळची कार्यकारिणी सर्वसमावेशक करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी काही सेल अध्यक्षांचे राजीनामे घेऊन तेथे अल्पसंख्याक आणि ओबीसी चेहरे आधीच देण्यात आले आहेत. तर, उद्या नवी कार्यकारिणी जाहीर करताना आणखी काही सेलचे अध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता आहे.
तेथे ओबीसी चेहरे दिले जाणार आहेतमहापालिका जिंकण्यासाठी शहरातील सर्व ४६ प्रभागांना व त्यातील तिन्ही वॉर्डांनासुद्धा अध्यक्ष दिले जाणार आहेत. याशिवाय शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १५ अध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस केले जाणार आहेत.
पुरुष, महिला अशा दोन्ही पातळ्यांवर हे पदाधिकारी नेमले जाणार आहेत. पालिका निवडणूक कधीही झाली तरी, पक्षाचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय आहे, असे राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते फजल शेख यांनी सांगितले