कोणत्याही परिस्थितीमध्ये औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा सुरुळीत करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरें


औरंगाबाद शहरामध्ये पाणीपुरवठ्याच्या 1680 कोटी रूपयांची योजना वेगाने पूर्ण करावी याकरिता मुख्यमंत्री संकल्प कक्षातून आढावा घ्यावा, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.दरम्यान, औरंगाबादमध्ये पाणीपुरवठा वेळेत होत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला होता. पाणी वितरण किती आणि कसे वाढवून मिळेल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. पाणी वितरणात लवकरात लवकर सुधारणा कराव्यात, अश्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदिल्या आहेत
भाजपच्या नेतृत्वात नागरिकांनी मोठं आंदोलन पुकारलं होतं. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी तातडीने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत
.गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद पाणीप्रश्न चर्चेत आहेत. येथील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून महापालिका प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना सुनावलं आहे
. औरंगाबाद पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. मला कोणतीही कारणे सांगत बसू नका. तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीमध्ये औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा झाला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना बजावलं आहे. नविन योजना तयार होईपर्यंत बराच वेळ जाणार आहे. सध्याच्या पाणीपुरवठा वितरणामध्ये विभागीय आयुक्तांनी स्वत: लक्ष घालावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत