आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू – आ .हितेंद्र ठाकूर


मुंबई :. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना महाविकास आघाडीला दणाक्यापाठोपाठ दणके बसत आहेत.आधी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाबाबत सावध भूमिका घेतली. आणि आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू असं सांगतलं.आता महाविकास आघाडीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. तसंच मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेनं सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशात कारण आता सपानेही महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपनंही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना मैदानात उतरवलंय