ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनास प्रारंभ ज्योतिषांनी दुखिःतांना दिलासा द्यावा : पं.अतुलशास्त्री भगरे


पुणे – श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव )तर्फे आयोजित अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन टिळक स्मारक मंदिर येथे ८ जून रोजी सकाळी पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी (नासिक )यांच्या हस्ते झाले.८ व ९ जून २०२२ या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत हे अधिवेशन होत आहे.उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार होते.प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत (दादा ) शेवाळे, स्वागताध्यक्षा ज्योतिषाचार्या सौ.गौरी केंजळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रमणलाल शहा (सातारा ), रविंद्र जोशी (जळगाव ), ज्योतिर्विद सुनील पुरोहित, नरेंद्र सहस्त्रबुद्धे, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर, परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.सौ. ज्योती जोशी यांच्या हिंदी भाषेतील अनुवादित ज्योतिष विषयावरील तीन पुस्तकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.गौरी केंजळे यांनी प्रास्ताविक केले.अर्चना घाडी, पल्लवी फाटक यांनी सूत्रसंचालन केले
अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये दोन दिवस ज्योतिष विषयक भरगच्च विचारांची रेलचेल आहे. मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे.अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.अभिजित प्रतिष्ठान, दि इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई व प्रा.रमणलाल शहा सर्च ॲण्ड रिसर्च ज्योतिष सेंटर, सातारा यांचे सहकार्याने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील दहा ज्योतिष संस्थांचा सक्रिय सहभाग यात आहे.ज्योतिष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.सौ. ज्योती जोशी यांचा वाढदिवस त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे साजरा करण्यात आला. ज्योतिष क्षेत्रातील प्रवास व योगदान’ या विषयावर ॲड.सौ. सुनिता पागे यानी मनोगत व्यक्त केले.
दुखि:ताला मानसिक आधार द्या :भगरे गुरुजी
…………….
अतुलशास्त्री भगरे म्हणाले, ‘ प्रत्येक दुखि:ताला मानसिक आधार देण्याचे काम ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करावे. या शास्त्राशी निष्ठा ठेवावी. दैनंदिन जीवनात त्रस्त झालेल्या व्यक्तींना योग्य दिशा दाखवावी. ज्योतिष अधिवेशन हा ज्ञान सोहळा आहे. त्यातून सर्वांनी ज्ञानप्राप्ती करावी.
ज्योतिषशास्त्राच्या विद्यार्थ्यानी एकाग्रता ठेवावी. तरच हे शास्त्र यशाकडे नेईल, असेही ते म्हणाले.
साडेसाती, मंगळाचा विचार काढून टाका : जकातदार
अध्यक्षस्थानावरून बोलताना नंदकिशोर जकातदार म्हणाले, ‘ ज्योतिषांना कमीतकमी वेळात भविष्य विषयक प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत.शास्त्र म्हणून ज्योतिष विकसित झाले पाहिजे. वास्तूशांती ऐवजी वास्तूपूजा हा शब्द वापरला पाहिजे. साडेसाती,कुंडलीतील मंगळाचा विचार, नारायण नागबळी, वास्तू दोष हे शब्द काढून टाकले पाहिजे.ज्योतिषशास्त्र हे सल्ला शास्त्र आहे, आपण सल्ला सेवा देऊन फी घेत असतो. त्यामुळे ज्योतिषांनी शॉप अँक्ट लायसन्स काढावे.
चंद्रकांत शेवाळे म्हणाले, ‘प्रत्येक ज्योतिष पध्दती आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. ज्योतिष पाहण्याच्या शंभरहून अधिक पध्दती विकसित झाल्या आहेत.
ज्योतिष अभ्यासकांनी दीर्घ अभ्यास करून त्याचा लाभ करून द्यावा. एकाच पद्धतीने भविष्य सांगावे, दुसऱ्या पध्दतीने पडताळा घेण्याचा प्रयत्न करू नये.
आनंद दवे म्हणाले, ‘ ज्योतिषशास्त्र वैश्वीक असून ते कधीच संपणार नाही. भविष्यात ते विद्यापीठांमध्येही स्वीकारले जाईल.
सुनील पुरोहित म्हणाले, ‘ ज्योतिष व्यवसायाकडे सन्मानाने , सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.
अनिल चांदवडकर म्हणाले, ‘ ज्योतिषांना धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्राचा अभ्यास असला पाहिजे.
ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची भूमिका श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.सौ. ज्योती जोशी यांनी भाषणात सांगीतली. .
यानंतरच्या सत्रांमध्ये ज्योतिषशास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांनी उपस्थित ज्योतिषप्रेमींना मार्गदर्शन केले. सायंकाळी खेळ व गंमतीजमतीसह चर्चासत्र देखील झाले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
…………………………ज्योतिष अधिवेशनाच्या दोन दिवसांमध्ये तज्ज्ञ मान्यवर उपस्थित ज्योतिषप्रेमींना विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत. त्यामध्ये ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, पुणे, ज्योतिषाचार्य अनिल चांडवडकर, नाशिक, सौ. नेहा शहा, पुणे, सौ. जयश्री बेलसरे, पुणे, संजय बुधवंत, पुणे, प्राचार्य रमणलाल शहा, सातारा, श्रीमती निलम पोतदार व ऋषिकेश सेनगुप्ता, मुंबई, डॉ.सौ. ज्योती जोशी, जळगाव, डॉ. मकरंद सरदेशमुख, पुणे, ज्योतिष पंडीत विजय जकातदार, पुणे, प्रदीप पंडीत, पुणे, राजेश शर्मा, सुनील पुरोहित, मुंबई, देवव्रत बुट, नागपूर, डॉ.सौ. संजिवनी मुळ्ये, पुणे, डॉ. प्रसन्न मुळ्ये, रत्नागिरी यांचा समावेश आहे. याशिवाय अधिवेशनामध्ये ‘मेदनीय ज्योतिष’ या विषयावर चर्चासत्र देखील होणार आहे. त्यामध्ये सुनील पुरोहित, मुंबई, शरद जोशी, मुंबई, सिद्धेश्वर मारटकर, पुणे, उदयराज साने, पुणे यांचा सहभाग असणार आहे.
ज्योतिश्री पुरस्कार प्रदान सोहळा ९ रोजी
…………………………………
दि. ९ जून २०२२ रोजी म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात देखील तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाने होईल. दुपारच्या सत्रात चंद्रकांत ( दादा ) शेवाळे, पुणे यांना ज्योतिश्री जीवन गौरव पुरस्कार, डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे, पुणे यांना ज्योतिश्री जीवन गौरव पुरस्कार, सौ. चंद्रकला जोशी, औरंगाबाद यांना ज्योतिश्री आदर्श महिला ज्योतिर्विद पुरस्कार, देवदत्त जोशी, सोलापूर यांना ज्योतिश्री पुरस्कार, भरत सटकर, पुणे यांना ज्योतिश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सायंकाळी श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने अधिवेशनाचा समारोप होईल.
अधिवेशनात १० संस्थांचा सहभाग
…………………………….
श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव तर्फे या ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर अभिजित प्रतिष्ठान दि इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई व प्रा.रमणलाल शहा सर्च ॲण्ड रिसर्च ज्योतिष सेंटर, सातारा यांचे अनमोल सहकार्य या अधिवेशनाला आहे. याशिवाय भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, पुणे, गौरी कैलास ज्योतिष संस्था, पुणे, बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ, पुणे, फल ज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे, भृगु ज्योतिष व वास्तु समुपदेशन केंद्र, पुणे, आयादि ज्योतिष व वास्तु संस्था, नाशिक, वेदचक्षु व्याख्यानमाला, औरंगाबाद, श्री चैतन्य अभ्यास मंडळ, रत्नागिरी, अपूर्व-यश फॉरच्युन, पुणे, महिला ज्योतिर्विद संस्था, पुणे आदी संस्थांचाही या अधिवेशनात सहभाग आहे.