‘जीविधा’चा हिरवाई तपपूर्ती महोत्सव ९ जून पासून


पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत ‘जीविधा’संस्थेचा ‘हिरवाई तपपूर्ती महोत्सव’ ९ ते ११ जून पासून इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे आयोजित करण्यात आला असून वनस्पती,प्राणी,हिरवाई आणि पर्यावरण रक्षणाची चर्चा करणारी व्याख्याने,बिया वाटप आणि देशी वनस्पतींच्या लागवडीसाठी जनजागृती असे या महोत्सवाचे स्वरूप आहे.’जीविधा’संस्थेचे संस्थापक राजीव पंडित यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ९ ते ११ जून पासून सायंकाळी 6.30 ते 8.00 दरम्यान व्याख्याने होणार आहेत.
गुरवार, 9 जून रोजी उपक्रमाचे उद्घाटनपर व्याख्यान हे डॉ. मंदार दातार यांचे असून ‘शस्त्रसज्ज वनस्पती’ या विषयावर ते बोलणार आहेत. शुक्रवार, 10 जून रोजी डॉ श्रीनाथ कवडे हे ‘वनस्पती व प्राण्यांमधील परस्पर संबंध’ या विषयी बोलणार आहेत. शनिवार, 11 जून रोजी डॉ विनया घाटे या ‘ पुण्याची बदलती हिरवाई ‘ या विषयी बोलणार आहेत. याच दिवशी रमा कुकनुर व सहकारी भरतनाट्यम नृत्यातून वनस्पती विश्व साकार करणार आहेत.
या महोत्सवात दिनांक 9 ते 11 जून दरम्यान सायंकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान
निसर्गसेवक ‘संस्थेचे ‘रानभाज्या’ प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महोत्सवातील सगळे कार्यक्रम सर्वासाठी मोफत खुले आहेत.
देशी वनस्पतींच्या लागवडीसाठी जनजागृती
पर्यावरणप्रेमी नागरिकांना रोप पुरवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या देवराई फाऊंडेशनचे रघुनाथ ढोले यांना हातभार लावण्यासाठी ‘घरोघरी रोपवाटिका’ हा उपक्रमही महोत्सवात आयोजित करण्यात आला आहे. आपापल्या घरी प्रत्येकाने फक्त 5 रोपे वर्षभर वाढवून वनिकरण करणाऱ्यांना उपलब्ध करून दिली तर वनस्पती विविधता वाढायला मदत होईल,असा विचार या उपक्रमामागे आहे. यासाठी जीविधा तर्फे आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी 5 बिया घेऊन जाव्यात. त्यांची रोप वाढवून पुढील पावसाळ्याच्या सुरवातीला परत आणून द्यावीत. त्यांची योग्य ठिकाणी लागवड होईल हे बघण्याची जबाबदारी जीविधा संस्था घेईल. या मोहिमेला सुरुवात हिरवाई महोत्सवातून होणार आहे. कार्यक्रमाच्या वेळात इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे आपली सर्व माहिती देऊन बिया घेऊन जाव्यात. नितीन कुलकर्णी या मोहिमेचे प्रमुख आहेत . अधिक माहितीसाठी नितीन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधता येईल 9673009964 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.