चित्रा वाघ यांचा विधान परिषदेच्या पत्ता कट झाल्यानंतरही उमेदवाराचे. अभिनंदन

मुंबई :.भाजपने आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे यांचे विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या चेहऱ्यांनाही विधान परिषदेची लॉटरी लागली आहे.

केंद्रीय निवडणुक कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.विधान परिषदेसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता असणार आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ५३, शिवसेना (Shivsena) ५६ आणि कॉंग्रेसचे (Congress) ४४ आमदार आहेत.

या यादीतून माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, माधव भंडारी, केशव उपाध्ये अशा चर्चेतील नावांचा पत्ता कट करण्यात आला आहे.यांनी आपण विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. तसेच प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचं नावही चर्चेत होतं. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण दोघींनाही संधी देण्यात आलेली नाही.मात्र पत्ता कट झाल्यानंतरही चित्रा वाघ यांनी नाराज न राहता मनाचा मोठेपणा दाखवत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. “महाराष्ट्र विधानपरीषदेच्या सर्व उमेदवारांचे मनःपुर्वक अभिनंदन विजयी भव….” असे एका ओळीत ट्विट करत त्यांनी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छाही दिल्या

Latest News