चऱ्होली त वीस अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा. हातोडा


चऱ्होली त वीस अनधिकृत इमारती वर. महापालिकेचा. हातोडा
भोसरी, ता. ६ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाद्वारे चन्होलीतील २० इमारती व २५ पत्राशेडवर कारवाई करत ती काढून टाकण्यात आली. तसेच चन्होली फाटा ते दाभाडे सरकार चौकापर्यंतच्या रस्त्याच्या ४५ मीटर रुंदीकरणामध्ये येणाऱ्या अनधिकृत बांधकामावर सोमवारपासून (ता. ६) कारवाई करण्यास सुरुवात केली.
चन्होलीतील पुणे-आळंदी रस्त्यावरील चन्होली फाटा ते दाभाडे •सरकार या पावणेदोन किलोमीटरच्या रस्त्याचे ४५ मीटर रुंदीकरण्यात येणार आहे. महापालिकेद्वारे विकास आराखड्यातील या रस्त्याचे विकसन सुमारे १२ वर्षापूर्वी केले होते. तेव्हा या रस्त्याची रुंदी ३० मीटर ठेवली होती. मात्र, चन्होलीचा झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे विकास आराखड्यातील या रस्त्याचे ४५ मीटर रुंदीकरण करणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या चरोली फाटा ते दाभाडे सरकार चौक या 1600 मी दक्षिणेकडील लांब असलेल्या 45 मी रास्ता रुंदीने बाधित अनधिकृत बांधकामे व्यावसायिक पत्राशेड व गाळे पक्की दुकानावर कारवाई करण्यात आली
तसेच 45 मी रस्ता रुंदीने बाधित निवासी बांधकामे दुकाने गाळे पत्राशेड नागरिकांनी स्वतः हुन मशीन च्या साहाय्याने स्व खर्चाने पाडून टाकले
रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अनधिकृत बांधकामधारकांना | नोटीस मिळाल्यावर नागरिकांनी स्वतःहून घरे रिकामी करण्यास सुरुवात केली होती. नागरिक घराचे दरवाजे, खिडक्यांसह इतर साहित्य नुकसान न होता कसे काढता येईल याकडे लक्ष देत होते. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी भोसरी आणि मोशीत केलेल्या अनधिकृत कारवाईचा धसका घेतल्याचे दिसून आले. नागरिकांनी स्वतःहूनच सदनिका, पत्राशेड रिकामे केल्याने महापालिकेला कारवाई करणे सोपे जात आहे.
चन्होली फाटा ते दाभाडे सरकार चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर बुधवारपर्यंत (ता. ८) कारवाई करण्यात येणार आहे. नागरिक स्वतःहून त्यांची अतिक्रमणे काढून महापालिकेला सहकार्यही करत आहेत.

रुंदीकरणामध्ये येणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.गेल्या आठवड्यात येथील नागरिकांना करवाईची नोटीस देण्यात आली होती. महापालिकेने सोमवारी कारवाई करत २० इमारतीसह २५ पत्राशेड काढून टाकले. एकूण ४१ हजार चौरस फुटाच्या बांधकामावर कारवाई करण्यात आलो. हो कारवाई संध्याकाळी सात वाजेपर्यंत करण्यात आली.
चन्होली: चन्होली फाटा ते दाभाडे सरकार चौकापर्यंतच्या रस्त्याच्या ४५ मीटर रुंदीकरणामध्ये येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
राजेश आगळे क्षेत्रीय अधिकारी, संजय घुबे कार्यकारी अभियंता,सूर्यकांत मोहिते उपअभियंता,अमर जाधव कनिष्ठ अभियंता,अमित पवार स्थापत्य सहाय्यक ज्योती चांदगुडे स्थापत्य सहाय्यक,
सतिश डांगे स्थापत्य सहाय्यक,रिनल तिडके स्थापत्य सहाय्यक
रुपेश भुराने स्थापत्य सहाय्यक,सचिन नागरे स्थापत्य सहाय्यक
गौरव गवई सुपरवायझर,कुणाल ढिकले सुपरवायझर
65 MSF जवान दिघी पोलीस स्टेशन कडील 1 अधिकारी 5 पोलीस कर्मचारी 5 JCB इ प्रभाग विद्युत कर्मचारी अग्निशमन वाहन अंबुलन्स यांच्या साहाय्याने कारवाई. करण्यात आली