पत्नीच्या आठवणीना उजाळा मिळावा म्हणून पत्रकार बापुसाहेब गोरेनी केली २०० वृक्षाची लागवड !


पत्नीच्या आठवणीना उजाळा मिळावा म्हणून पत्रकार बापुसाहेब गोरेनी केली २०० वृक्षाची लागवड !
केज दि.६ ( प्रतिनिधी ) केज तालुक्यातील बनसारोळा येथील रहिवासी असलेले परंतु पुणे येथे स्थाईक असलेले पुणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आठवणीना उजाळा मिळावा म्हणून बनसारोळा येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या जातीच्या २०० वृक्षाची लागवड केली.पुणे येथील पत्रकार बापुसाहेब गोरे यांच्या पत्नी उषाताई गोरे यांचे गतवर्षी अकाली निधन झाले होते.त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ गोरे यांनी पुणे येथे स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून या ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.गतवर्षी इयत्ता दहावी परिक्षेत केज तालुक्यातूूून आलेल्या साळवे या मुलीला ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन तहसीलदार दुलाजी मेंढके व दैनिक झुंजारनेताचे जेष्ठ पत्रकार श्रावणकुमार जाधव यांचे हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता.
यावेळी आंबा, चिंच, जांभूळ,वड,अशा विविध फळवर्गिय व सावलीच्या झाडाची लागवड करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बनसारोळ्याचे माजी सरपंच भीमराव गोरे माळी हे होते.बनसारोळा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सरपंच जयचंद धायगुडे,विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नाना गुरुजी,माजी सरपंच अशोक आप्पा काकडे,बनसारोळा तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोमीन, डॉ.नंदकुमार गोरे,निवृत्त अधिकारी लक्ष्मण राऊत,कानडी माळी,बनसारोळा सोसायटीचे सदस्य,रामदास गोरे,खरेदी-विक्री संघाचे सदस्य दिलीप गोरे,ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गोरे,पिंटू काकडे,मेजर कुंडलिक बाप्पा गोरे,दगडू गोरे,ज्येष्ठ नागरिक भाष्कर गोरे,रामभाऊ गोरे,बंडू सांजूरे,प्रशांत सोनके,अशोक गोरे,पमु गोरे,पिंटू गोरे,भागवत गोरे,हनुमान शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीचे सचिव संजय घोडके,ग्रामशक्ती वेल्फेअर फौंडेशन अंबाजोगाई चे सचिव प्रा.भागवत गोरे,व्यंकटेश डांगे,दत्ता नाना गोरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची व्यवस्थापन सुधीर गोरे,शुभम गोरे,ओम गोरे,श्रीधर मनेरी, विकास राऊत व अंकुश राऊत यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाईचे अध्यक्ष जोतीराम सोनके सर यांनी केले.
या वर्षी देखील स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, व ग्रामशक्ती वेलफेअर फौंडेशन अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय उषाताई गोरे यांच्या जयंती व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केज तालुक्यातील बनसारोळा येथे रविवार दि.५ जून २०२२ रोजी सकाळी १० वा.वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.