विधानपरिषद पंकजा मुंडे संधी द्यायला हवी होती- छगन भूजबळ


मुंबई विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष यादीत मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं. “उमेदवारीची संधी मिळाल्यास या संधीचं सोनं करेन,” असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी पंकजा मुंडेंबाबत सूचक विधान केलं आहे. भूजबळ माध्यमांशी बोलत होते: भाजपने आज विधानपरिषद निवडणुकीसाठी आपली यादी जाहीर केली. केंद्रीय समितीने पाच जणांची नावे निश्चित केली आहेत. यादीत मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. यावर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.भाजपनं प्रवीण दरेकर माजी मंत्री राम शिंदे श्रीकांत भारतीय उमा गिरीश खापरे प्रसाद लाड या पाच जणांची नावं जाहीर केली आहेत. यादीतून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना मात्र संधी देण्यात आलेली नाही.भूजबळ म्हणाले, “दिलेल्या संधीचं सोनं करेन,असे पंकजा मुंडेचं स्टेटमेंट वाचलं होत. पण त्यांना डावलण्यात आले. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं.संधी द्यायला हवी होती,””एकनाथ खडसे यांच्या बाबतीत तेच झाले होते. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल असं वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो,” असे सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केले.भूजबळ म्हणाले, “भाजपने राज्यसभा निवडणूकीत उमेदवार दिला. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील, आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही तयारी करावी लागेल, कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील,””राज्यसभा असो या विधानपरिषद असो यातील घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील