सार्वजनिक जीवनात कला दृष्टी तयार व्हावी : चारुहास पंडित


…………………..
प्रतिमा उत्कट रंग कथा २२’ प्रदर्शनात उलगडला ‘ चिंटू निर्मितीचा प्रवास ‘
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन
पुणे :
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या ‘कला आणि संस्कृती ‘ विशेष उद्दिष्ट गटाने ‘ आर्टिस्ट कट्टा ‘ च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २२ ‘ या चित्र प्रदर्शनात शनीवारी सकाळी ‘ चिंटू च्या निमित्ताने ‘ या संवाद कार्यक्रमात चिंटू व्यक्तीरेखेचा प्रवास उलगडला.
शनीवारी सकाळी ११ वाजता ‘ चिंटूच्या निमित्ताने ‘ विषयावर चारुहास पंडित तर सायंकाळी ५ वाजता विलास कुलकर्णी यांनी लँडस्केप या विषयावर संवाद साधला.
चारुहास पंडित म्हणाले, ‘ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाने कलेसाठी निर्माण केलेले व्यासपीठ कलाकारांसाठी उपयुक्त आहे. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. अशा उपक्रमातून कलेबद्दल रूची वाढेल. त्याचे परिणाम पुढील काळात दिसतील. कला पाहण्याचा आणि कला समजण्याचा दृष्टिकोण तयार होणे गरजेचे आहे. सार्वजनिक जीवनात कलेच्या सुमार दर्जाच्या अनेक गोष्टी मांडलेल्या असतात. हे चित्र बदलण्याचे काम अशा उपक्रमातून होईल, अशी आशा वाटते ‘.
मिलिंद संत, डॉ. पं.समीर दुबळे, श्रीमती अमिता पटवर्धन, श्रीमती चेतना गोसावी, शिवाली वायचळ, भार्गवी कानडे यांनी स्वागत केले.
दि. ९ ते १२ जून २०२२ या काळात राजा रवीवर्मा कला दालन, घोले रस्ता, पुणे येथे हे प्रदर्शन सुरू आहे.
कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गट हा विविध कला प्रकारात काम करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला एक महत्वाचा गट आहे. या गटाने या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
१० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील.
या प्रदर्शनात सुमारे ७० कलाकारांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
चित्रकारांची प्रात्यक्षिके आणि संवाद
रविवारी सकाळी ११ वाजता स्नेहल पागे पोट्रेटचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. दुपारी ४ वाजता संजय देसाई जलरंगातील प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता ‘ कला- संदर्भ आणि अर्थ ‘ या विषयावर डॉ. श्रुती निरगुडकर संवाद साधणार आहेत.