पिंपरी चिंचवड 2022-2023 या आर्थिक वर्षाचे 950 कोटींचे उद्दिष्टये…

पिंपरी, : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन 2022-2023 या आर्थिक वर्षाचे 950 कोटींचे उद्दिष्टये साध्य करण्यासाठी मालमत्ता कर संकलन विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी मालमत्ता कर सेवा सुधारण्यासाठी अनेक प्रोत्साहन योजना लागू केल्या आहेत. अद्यापही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा थकीत मालमत्ता कर जवळपास 400 कोटी आहे. नागरिकांनी कर भरून ३० जून पर्यंत सूरू असलेल्या महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनीवर मालमत्ता कर आकारणी व वसुली करण्यात येते. महानगरपालिकेचा करसंकलन विभाग स्थायी स्वरुपाचे उत्पन्न ‍मिळवून देणारा विभाग आहे. करसंकलन विभागामार्फत नागरिकांना जलद आणि सोप्या पध्दतीने सेवा मिळाव्यात, यासाठी नव्याने ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता ना देय दाखला, स्वयंमुल्य निर्धारण अशा सेवा देण्यात येत आहेत. तसेच महिला, ‍दिव्यांग व्यक्ती, पर्यावरण पुरक उपक्रम राबविणाऱ्या सोसायट्‌यांना सामान्य करामध्ये भरघोस सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतींचा लाभ घेण्याची अंतिम मुदत 30 जून 2022 पर्यंत देण्यात आली आहे.

महानगरपालिकेकडे थकीत मालमत्ता कर असलेल्या मालमत्तांची संख्या सुमारे पन्नास हजारपेक्षा जास्त असून त्यांच्याकडील एकूण थकीत मालमत्ता कर सुमारे 400 कोटी आहे. गतवर्षी जवळपास 36,399 मालमत्तांना जप्तीपुर्व नोटीसा बजाविण्यात आल्या असून त्यापैकी 286 मालमत्तांची जप्ती करण्यात आली होती. यंदा जवळपास 2700 मालमत्ताधारकांना जप्तीपुर्व नोटीस बजाविण्यात आलेली आहे. सर्व मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरून जप्तीची कारवाई टाळावी. सन 2022-2023 मध्ये महानगरपालिकेने आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासूनच मालमत्ता कर वसूलीची धडक मोहिम राबविलेली आहे. गेल्या आठवड्यात 2 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. जप्तीची ही मोहिम यापुढे निरंतर स्वरुपात राबवण्यात येणार आहे. मालमत्ता जप्ती बरोबरच वसूलीसाठी इतर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.

कर आकारणी व कर संकलन विभाग,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Latest News