अजित पवार यांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयानेच परवानगी नाकारली…

अजित पवार यांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयानेच परवानगी नाकारली, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित पवार यांना भाषण करु न देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी हे तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पुण्यात आले. ६ मार्च रोजी त्यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रोचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमात अजित पवार यांनी थेट राज्यपालांवर निशाणा साधला होता. त्याचा हा परिणाम असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांच्या हस्ते देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) यांचे भाषण झाले. त्यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरून कौतुकही केलं. पण याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदींशेजारी बसलेले उपमुख्यमंत्री  यांनी भाषण केलं नाही. त्यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (PM Narendra Modi Latest News)याच चर्चांना काँग्रेसकडून दुजोरा देण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, अजित पवार यांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणे हे जाणिवपूर्वक घडले आहे असे दिसते. गतवेळेस दादांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची शिवराय व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणली होती. त्याचाच राग निघालेला दिसत आहे, असे म्हटले आहे कार्यक्रमात सुरूवातीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होईल, असे वाटत होते. ते राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे त्यांचे भाषण अपेक्षितच होते. पण फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर निवेदकाने थेट पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतले. यावेळी मोदी यांनीही निवेदकाकडे पाहत अजितदादांच्या दिशेने हात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. अजित पवारांनी कार्यक्रमात भाषण न केल्याने आता राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

Latest News