आळंदी मध्ये हॉकर्स पॉलिसी राबविण्यासाठी पाठपुरावा करणार – बाबा कांबळे

  • आळंदी येथे टपरी पथारी हातगाडी धारकांची बैठक संपन्न

पिंपरी / प्रतिनिधी

टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने आळंदी शहरांमध्ये सर्वप्रथम हॉकर्स पॉलिसी राबविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तातडीने हॉकर्स झोन बाबत सर्वे केला पाहिजे. आगामी काळात त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शनिवारी अधिकाऱ्यांना भेटून हॉकर्स पॉलिसी राबविण्याबाबत मागणी करणार असल्याचे टपरी, पथारी, हातगाडी पंचायतिचे अध्यक्ष कष्टकरी नेते बाबा कांबळे यांनी केले.

आळंदी नगरपालिका येथे मोठ्या संख्येने फळ भाजी विक्रेते, टपरीधारक आहेत. कार्तिकी व आषाढीवारी दरम्यान त्यांना नेहमी त्रास दिला जातो. इतर बाहेरील व्यक्तींना जागेचे नियोजन करून अनेकांना मात्र बेरोजगार केले जाते. नुकताच आषाढी वारीमध्ये देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर टपरी, पथारी, हातगाडी पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी येथे बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

या वेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सरचिटणीस प्रकाश यशवंते, कष्टकरी गटई कामगारांचे नेते दत्त शिंदे, ऍड. प्रिया सोनवणे, सुलतान शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन समितीची स्थापना –

या वेळी ॲड. प्रियेश सोनवणे,सुलतान शेख,अर्जुन मेदनकर,
ॲड. सोहेब अब्बास शेख नंदकुमार साठे संगीता मेटे रूकसना शेख,भाग्यश्री कोंडगे,सेजवान काशीद
प्रशांत लोणार,एम.डी पोखरे,यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आळंदी येथील कामकाज सुरळीत होण्यासाठी ही समिती काम करणार आहे. नुकतीच टपरी, पथारी, हातगाडी पंचायत आळंदी शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. यामुळे येथील संघटनेचे कामकाज थांबले आहे. संघटनेचे कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

Latest News