पीसीसीओई ला एन. बी. ए. मानांकन प्राप्तपीसीसीओई च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

IMG-20220619-WA0169

पीसीसीओई ला एन. बी. ए. मानांकन प्राप्तपीसीसीओई च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

पिंपरी, पुणे (दि. १९ जून २०२२) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) निगडी प्राधिकरण येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला (पीसीसीओई) नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडीटेशन (एनबीए) यांचे अतिशय प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाले आहे अशी माहिती पीसीईटीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे. पीसीसीओईच्या सिव्हील, कॉम्प्युटर, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, माहिती व तंत्रज्ञान आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रथम वर्ष या पाचही विभागांनी एन. बी. ए. मानांकनासाठी आवश्यक असणा-या सर्व अटींची पुतर्ता करीत पुढील तीन वर्षांसाठी हे मानांकन पटकावले आहे.

यापैकी बऱ्याच विभागाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हे मानांकन मिळवले आहे. उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या संधी यांमुळे पीसीसीओई हे पुण्यामधील नंबर ३ चे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून प्रसिध्द आहे.

नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत असणारे आर्टिफिशयल इंटेलिजन्स , मशीन लर्निंग असे नवीन कोर्सेस देखील पीसीसीओई महाविद्यालयाने सुरू केले आहेत . त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठी भाषेत इंजिनिअरिंग कोर्स सुरू करण्याची अनोखी संकल्पना राबविण्याचा मान देखील पीसीसीओईने प्राप्त केला आहे .एनबीए मानांकन प्राप्त झाल्याने, पीसीसीओई मधील विद्यार्थ्यांचा परदेशात उच्च शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश सुलभ होणार असून, अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नोकरीच्या अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत

. एनबीए मुळे या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, वर्तन आणि वृत्ती अशा गुणविशेषांवर महाविद्यालयात विशेष लक्ष देण्यात येते.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व त्यांची पदव्युत्तर व्यावसायिक वाटचाल यासाठी महाविद्यालयाचे योगदानही प्रशंसनीय आहे. याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पीसीसीओई महाविद्यालयाचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे अभिनंदन केले व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या विषयी माहिती देताना पीसीसीओई महाविद्यालयाचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले

की, येथे उत्तम विद्यार्जन करण्यास व उत्तमोत्तम सेवाव्रती व्यावसायिक घडविण्यास कटीबद्ध आहोत.सुरुवातीपासूनच पीसीसीओईची वाटचाल शैक्षणिक प्राविण्य, संशोधन व नवनिर्माण, व्यवसायाभिमुखता आणि सामाजिक बांधिलकी या चतु:सुत्रीवर असून विद्यार्थ्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर क्रीडा, सांस्कृतिक आदि सर्वांगीण विकासावर भर दिल्याने एन.बी.ए. परीक्षणास आम्ही आत्मविश्वासाने सामोरे गेलो.

सर्व विश्वस्तांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे सांघिक योगदान यामुळे हे मानांकन आम्हास प्राप्त झाल्याचे पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले………………………….

Latest News