करियार मार्गदर्शन शिबीराला प्रतिसाद

IMG-20220619-WA0114(1)
मार्गदर्शन शिबीराला प्रतिसाद

पुणे :इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप तर्फे दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण-अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता शनिवार,१८ जून रोजी करियर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.पारगेनगर(कोंढवा) येथील सिटी लॉन्स येथे दुपारी दीड वाजता हे शिबीर पार पडले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुभाष वारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ रियाझुद्दीन अध्यक्षस्थानी होते.करियर मार्गदर्शक संजय साळुंके,मानसशास्त्रज्ञ डॉ.विभा देशपांडे,पुणे मनपा समाजविकास विभागाच्या श्रद्धा मोकले,योजना कणसे इत्यादी मान्यवरानी मार्गदर्शन केले.इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक इस्लाम बागवान यांनी स्वागत केले.सूर्यकांत जूजकर,राजू सय्यद,इब्राहिम खान,रियाझ मुल्ला,अशोक सोनवणे,ऋषिकेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते……

Latest News