भारती विद्यापीठ पौड रस्ता कॅम्पस मध्ये योग दिवस साजरा

पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या पौड रस्ता कँपस मध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योग मार्गदर्शक सुषमा येंगे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके झाली. प्राद्यापक वर्ग,कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी योग प्रात्यक्षिके केली.भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते योग मार्गदर्शक सुषमा येंगे यांचा सत्कार करण्यात आला. ‘ भारती विद्यापीठ’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये विविध महाविद्यालयांच्या सहभागाने हा कार्यक्रम झाला.

..

Latest News