एक कवी, एक भाषा ‘ व्याख्यानास प्रतिसाद कंथारिया यांच्या गझलेत प्रेमांश आणि ज्ञानांश ! :हेमंत पुणेकर यांचे प्रतिपादन

‘ एक कवी, एक भाषा ‘ व्याख्यानास प्रतिसाद

कंथारिया यांच्या गझलेत प्रेमांश आणि ज्ञानांश ! :हेमंत पुणेकर यांचे प्रतिपादन

पुणे :

‘ प्रेमांश आणि ज्ञानांश हे दोन्ही गुण गुजराती गझलकार बालाशंकर कंथारिया यांच्याकडे होते, त्यामुळे ते खूप मोठे कवी झाले , असे मत कवी हेमंत पुणेकर यांनी व्यक्त केले.

रसिक मित्र मंडळातर्फे ‘ एक कवी, एक भाषा ‘ उपक्रमांतर्गत ‘गुजराती गझलकार बालाशंकर कंथारिया ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे २३ जून रोजी सायंकाळी सहा वाजता झाला.

  अध्यक्षस्थानी रसिक मित्र मंडळाचे संस्थापक सुरेशचंद्र सुरतवाला होते.  रसिक मित्र मंडळाचे विश्वस्त प्रदीप निफाडकर यांनी गुजराती कवी हेमंत पुणेकर यांचा परिचय करून दिला. ते म्हणाले, एक कवी एक भाषा या उपक्रमात तरूणांचा सहभाग वाढावा म्हणून प्रयत्न केले जातील . 

   गुजराती कवी हेमंत पुणेकर यांनी बालाशंकर कंथारिया यांच्या गाजलेल्या गुजराती गझलाचे वाचन करून त्याचा अनुवाद सांगितला. हेमंत पुणेकर म्हणाले,'बालाशंकर हे स्वच्छंदी स्वभावाचे होते. त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंत झाले. त्यांना फारसी , संस्कृत, ब्रजभाषा, गुजराती या भाषा चांगल्या अवगत होत्या.काव्य आणि संगीताची उत्तम जाण होती. त्यांना साहित्याची खूप ओढ होती.  बालाशंकर कंथारिया यांनी गझलांबरोबरच अनेक निबंध,विवरण,कवितांवरील रसग्रहण, विविध साहित्य प्रकारातील भाषांतरे केली आहेत. पाच ते सात खंड काव्य व अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.


नर्मदा शंकर जोशी यांनी बालाशंकर कंथारिया यांच्या जीवनावर  ' कवी बाल- ते मनू जीवन अने साहित्य सेवा ' हे पुस्तक लिहीलेले आहे.१८५८ ते १८९८ अवघ्या ४० वर्षाच्या कालखंडात कंथारिया यांनी खूप मोठे लेखनकार्य केले. प्रेमांश आणि ज्ञानांश  हे दोन्ही गुण   कंथारिया यांच्याकडे होते त्यामुळे ते खूप मोठे कवी झाले'. 

Latest News