अशा गद्दरांना गाडून आपला भगवा फडकवू …. शिवसेना नेता विनायक राऊत


गुरूवारी माहिम मतदार संघांतील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेविका, नगरसेवक यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना नेता विनायक राऊत उपस्थित होते. ज्या लोकांनी गद्दारी केली, अशा गद्दरांना गाडून आपला भगवा फडकवू असं ते म्हणालेकाही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली. अद्याप माहिम मतदारसंघात शिवसेना अजूून शाबूत आहे. ते अजूनही मजबूत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना खंबीर काम करत आहे. अशी गद्दारी शिवसेनेने याआधी पचवली आहे, अशी टीका त्यांनी माध्यामांशी बोलताना केली आहे.महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी गेल्या काही दिवसात घडत आहेत. एकनाथ शिंदेयांच्या बंडखोरीमुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली, अशी बोचरी टिका शिवसेना नेता विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केलीदरम्यान, एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी मिळून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहिलं. एकनाथ शिंदेसह 12 आमदारांना निंलबित करावं, अशी मागणी त्या पत्रात होती. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उत्तर दिलंय.