राऊत आमच्या राजीनाम्यांची मागणी करत आहेत. तेच आमच्या मतांवर निवडून आलेत….


मुंबई :. उदय सामंत यांच्याकडे पुण्याची जवाबदारी होती, ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तींय आहेत, तरी ते पक्ष सोडताय हे शिवसेनेने लक्षात घ्यावे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 39 आमदार आमच्यासोबत आहेत. तर इतर 12 अपक्ष असे एकूण 51 आमदार आमच्यासोबत आहे. आदित्य ठाकरेंना आम्ही पक्षातील घाण म्हणतात.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना आम्ही घाण वाटतो का?, असा कडा सवाल शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी शिवसेना नेतृत्वाला केला आहे
संजय राऊत यांनी आमच्या मतावर राज्यसभेची निवडणूक लढवली आणि विजय संपादित केला आहे. यामुळे संजय राऊत यांनी आमच्या विरोधात बोलू नये. आम्ही होतो म्हणून शिवसेनेचे 54 आमदार निवडून आले नाहीतर शिवसेनेची सत्ता आली नसती. राऊतांची वक्तव्य ही राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहेत.
. ‘उदय सामंत आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. त्यानंतरही त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी असे का केले यावर पक्ष नेतृत्वाने विचार करावा. आम्ही त्यांना घाण वाटतो काय?,’ असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी सेना खासदार संजय राऊत यांच्यावरही तिखट शब्दांत निशाणा साधला. राऊत आमच्या राजीनाम्यांची मागणी करत आहेत. तेच आमच्या मतांवर निवडून आलेत. त्यांनीच आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येवून दाखवावे, असे केसरकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या आमदारांविरोधात उमेदवार जाहीर केले जात होते, तेव्हा कुणी लक्ष दिले नाही. उरलेल्या शिवसेना आमदारांना इतर पक्षांत जावे लागेल, आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जवळचा माणत असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होतील.आम्ही पक्षासाठी अनेक केसेस अंगावर घेतल्या, आमच्या मतदारसंघात आमची लोकप्रियता आहे. म्हणून आम्ही निवडून येतो यात शिवसेनेचा हात नाही असे नाही. संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून गेले त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापस आणले. तसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्हाला वापस बोलवायला हवे होते. मात्र त्यांनीतसे न करता आमच्या कुटुंबावर शाब्दिक हल्ले चढवले ते आम्ही ऐकूण घेऊन घेणार नाही