माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…


पुणे :. माजी नगरसेवक बाळा ओसवाल तेथे आले. त्यांनी फिर्यादीस संबंधित जागा आपण विकत घेतली असून तेथील व्यक्तीही आपल्या आहेत, असे सांगत धमकी दिल्याचे रिठे यांच्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.जमीनीवर हक्क सांगून संबंधित जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करुन धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी एका माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मी सातत्याने पक्षाच्या बैठकीच्या गडबडीमध्ये होतो. त्यांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मला मिळाली. या प्रकरणाशी माझा कुठल्याही प्रकारे संबंध नाही-माजी नगरसेवक बाळा ओसवाल
रिठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी रिठे यांचे पती व दिराने गंगाधाम रस्ता परिसरात जमीन खरेदी केली आहे. मात्र संबंधित जमीन ही सुमीत तेलंगने त्याचे वडील दिलीप तेलंग यांच्या मालकीची असल्याचे फिर्यादीस सांगितले. त्यांच्यात वाद होते. दरम्यान, रिठे, त्यांची बहीण निलिमा व आई मुक्ता कांबळे या संबंधित जमीनीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी तेथे गेल्या होत्या.
त्यावेळी संशयित आरोपी तेलंग, रणदिवे, बनसोडे यांनी फिर्यादी, त्यांची बहिण व आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर तेलंग याने फिर्यादीचे डोके घराच्या भिंतीवर आपटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली
. हि घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डजवळील गंगाधाम परिसरात घडली. दरम्यान, माजी नगरसेवकाने या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सुमीत तेलंग, शहाजी रणदिवे, सुकेशनी ऊर्फ राणी बनसोडे, बाळा ओसवाल असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुषमा सुनील रिठे (वय 32, रा. गंगाधाम रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे माझा संबंधित प्रकरणातील वादाशी कोणताही संबंध नाही. दोन्ही नातेवाईकांची जमीनीवरुन भांडणे आहेत.