शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?


मुंबई :. शिवसेना नेते हे बंडखोर आमदारांसोबत सध्या गुवाहाटी येथे आहेत. दरम्यान, आता शिंदे यांनी आणखी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केला आहे.
माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेना आणि च्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात की, ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात पाठवले त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्री मंडळात बसता हे तुम्हाला चालतं का. याचमुळे आम्ही १२ आमदार एक वर्ष विधीमंडळातून निलंबित होतो.शिवसेना प्रमुखांच्या प्रेमामुळे निलंबित होतो.
आजही शिवसेनेबद्दल आमच्या मनात नितांत प्रेम आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाला मी पाठिंबा दर्शवतो आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शिवसैनिकांनीही आवाहन आहे. ते म्हणतात, एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यावा, असे केले तरच शिवसेना आणि महाराष्ट्र टिकणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
साबणे यांचा हा व्हिडीओ शिंदे यांनी ट्वीट केल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.दरम्यान, आता या ट्वीटमुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेना असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. आज एकनाथ शिंदेंसह शिवसेना नेत्यांच्या बंडाचा आज सातवा दिवस आहे. हे बंड आता केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं आहे.
बंडखोरांविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे आणि इतर बंडखोर शिवसेना आमदारांविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये त्यांच्या अधिकृत कर्तव्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि त्यांना कार्यालयात पुन्हा कामावर येण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली आहे.