श्री.एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा केली


सत्तेतून विरोधकांकडे गेलो आहोत. मीही मंत्री होतो. पण राज्याच्या भविष्याच्यादृष्टीने जे घडत होते, ते योग्य नव्हते. काही निर्णय आघाडीत घेता येत नव्हते. आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन गेल्यानंतर काही निर्णय झाले. पण हे पुर्वीच व्हायला हवे होते.हे घडत असताना 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे 50 लोक एकत्र येतात. या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न मला सांगितल्यानंतर हा निर्णय मला घ्यावा लागला. राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या मनातील अपेक्षांसाठी घेतला.आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून आणि इतर पक्ष असे 50 आमदार एकत्र आहोत. वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षापुर्वी जे घडलं आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्री महोदयांना मतदारसंघातील समस्या, विकासप्रकल्प, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली.मीदेखील अनेकदा चर्चा केली. आमची नैसर्गिक युती होती, त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याबाबत आमदारांमध्ये नाराजी होती आणि मतदारसंघातील प्रश्न किंबहुना पुढच्या निवडणुकीत लढणे किंवा जिंकणे याबाबतच्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही भूमिका मांडली. पण आम्ही कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता ही भूमिका घेतली.आज फडणवीसांकडे 120 चे संख्याबळ आहे. असं असतानाही मुख्यमंत्रिपद तेही घेऊ शकले असते. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. याबद्दल मी त्यांचा मनापासून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, फडणवीसांचे आभार मानतो. ही ऐतिहासिक घटना आहे. जे काही घडलं ते वास्तव आपल्यासमोर आहे.राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू. फडणवीस आमच्या पाठिशी आहेत. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस पाहायला मिळत नाही. आजकालच्या राजकारणात काय होईल, हे आपण पाहत असतो. पण काही मिळत असताना त्यांनी जी उदारता दाखवली आहे ती दुर्मिळ आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.एकीकडे मोठे नेते आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेसारख्या छोट्या कार्यकर्त्यासोबत येऊन ते माझ्यासोबत आले. माझ्यासोबतच्या 50 आमदारांनी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यांना यापूर्वी आलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आता आमची ताकद वाढली आहे. आणखी किती येतील, हे माहित नाही. पण सर्वांचे पाठबळ मला मिळेल. ज्या राज्यात केंद्र सरकारची ताकद उभी राहते, तिथे विकासात अडचण येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं- देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार येईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपचे मंत्री सहभागी असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे सरकार पडलं त्यावेळी महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देणं आवश्यक होतं.- मी त्याचवेळी सांगितलं होतं हे सरकार चालणार नाही. आम्ही निवडणुका लादणार नाही, हे सांगितलं होतं. म्हणून शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा गट आणि 16 अपक्ष आणि छोट्या पक्षांचा गट सोबत आले आहेत. या सगळयांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. भाजपने हा निर्णय केला की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. ही तत्वांची लढाई, हिंदुत्वाची, विचारांची लढाई आहे, असं फडणवीस म्हणाले.शिंदे यांच्या नेतृत्वात मेट्रो, मराठी आरक्षण, ओबीसी आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवले जातील. प्रत्येक टप्प्यावर दुर्बल घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल. त्यामुळे शिंदे यांचे मी अभिनंदन करतो, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. आमचे 106 आणि इतर अपक्षांच्या समर्थनाचे पत्र आम्ही राज्यपालांकडे सोपवले आहे. राज्यपालांनी सायंकाळी साडेसात वाजता शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. आज केवळ त्यांचीच शपथ होईल. त्यानंतर मंत्रिमंडलाचा विस्तार केला जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मी सरकारबाहेर राहून या सरकारला मदत करणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना 56 जागा आणि आम्ही 106 जागा अशा जवळजवळ 170 लोकं निवडून आली होती. साहजिकच ही अपेक्षा होती की भाजप आणि शिवसेनेचं सरकार होईल. त्यावेळी पंतप्रधानांनी सर्वांच्या उपस्थित भाजपचे मुख्यमंत्री बनेल अशी घोषणाही केली. पण दुर्देवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना आणि नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. आणि विशेषत बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला आणि ज्यांनी हिंदुत्वाच्या विचाराचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसोबत युती केली. भाजपला बाहेर ठेवलं. हा जनतेनं युतीला मतं दिली होती. पण त्याचा अपमान त्यावेळी झाला, असं फडणवीस यांनी सांगितलं.
मागील अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री हे भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये जाणं हे अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती. खेदजनक बाब होती. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रु असलेल्या दाउदशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरूनही काढण्यात आला नाही. रोज सावरकर, हिंदुत्वाचा अपमान केला जात होता. शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं. पण गव्हर्नरचं पत्र आल्यानंतर कुठलीही कॅबिनेट घ्यायची नसते हा नियम आहे. पण तरीही बैठक घेतली. जाताजाता हे निर्णय घेतले. अर्थात येणाऱ्या सरकारला हे परत निर्णय घ्यावे लागतली.
या काळात शिवसेनेच्या आमदारांची मोठी कुचंबणा झाली. उद्या आम्ही कशाच्या भरवसावर लढायचं. आमच्याच मतदारसंघात आमचे हरलेले विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवशावर लढायचं, असा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांनी काॅग्रेस-राष्ट्रवादीसी युती तोडण्याचा निर्णय घेतला. पण उद्धवजींनी या आमदारांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त प्राधान्य दिलं आणि शेवटपर्यंत त्यांचीच कास धरली.
हे सरकार पडलं त्यावेळी महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देणं आवश्यक होतं. मी त्याचवेळी सांगितलं होतं हे सरकार चालणार नाही. आम्ही निवडणुका लादणार नाही, हे सांगतलं होतं. म्हणून शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा गट आणि 16 अपक्ष आणि छोट्या पक्षांचा गट सोबत आले आहेत. या सगळयांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. भाजपने हा निर्णय केला की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. ही तत्वांची लढाई, हिंदुत्वाची, विचारांची लढाई आहे.