५१२ ऑर्डनन्स फॅक्टरी रोड सैन्यातील कुटूंबियांना खुला करण्याची मागणी

अनेक व्यापाऱ्यांवर रस्ता बंद असल्याने अोढविले आर्थिक संकट

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये ५१२ ऑर्डनन्स फॅक्टरी रस्ता कोरोना काळात बंद करण्यात आला होता. रस्ता बंद करण्यात आल्याने सैन्यातील अधिकारी, कर्मचारी, तसेच त्यांच्या कुटूंबियांना मोठा वळसा पडत खरेदीसाठी अन्य ठिकाणी जावे लागते. ५१२ ऑर्डनन्स फॅक्टरी रस्ता वरील जुना बाजार परिसरातील व्यापाऱ्यांना त्यामुळे आर्थिक तोटा होत असून केवळ सैन्यातील अधिकारी, कर्मचारी, तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी हा रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी खडकी जुना बाजार असोसिएशनने डिफेन्स इस्टेट ऑफिसर तसेच कॅन्टोमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे केली आहे. बोर्डाच्या हद्दीमध्ये ५१२ ऑर्डनन्स फॅक्टरी रोड कोरोना काळात प्रशासनाने बंद केला होता. रस्ता बंद करण्यात आल्याने सैन्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटूंबियांना वस्तू, सामान, भाजी खरेदीसाठी मोठा वळसा पडत आहे. या रस्त्यावर अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत, मात्र सैन्यातील कर्मचारी अधिकारी तसेच कुटूंबियांना रस्ता बंद करण्यात आल्याने ग्राहक अन्यत्र जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. सैन्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटूंबियांना वस्तू, सामान खरेदी करण्यासाठी मोठा वळसा पडत आहे, मोठा वळसा पडत असल्याने त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असून प्रशासनाच्या वतीने त्वरित रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी खडकी बाजार जुना बाजार असोसिएशनचे अध्यक्ष निकित यादव, उपाध्यक्ष दीपक अग्रवाल, सचिव चिंतन शहा यांनी डिफेन्स ऑफिसर तसेच बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर डी. जी. पटवर्धन, सीइओ रॉबिन बलेचा यांच्याकडे अनेक व्यापाऱ्यांच्या सह्यांचे निवेदना द्वारे केली आहे.

Latest News