पुणेकरांनाही आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार…

पुणे शहरात आणि परिसरात पावसाची कमतरता आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. म्हणून पुढील आठवड्यात 4 जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल आणि त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ले.पुणेकरांसाठीही (PMC) वाईट बातमी आहे. पुणेकरांनाही आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. (Water Cut in Pune).पुणे मनपा प्रशासनाने घेतला हा निर्णय –पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता होती. त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून आता पुण्यात सोमवार, 4 जुलैपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आज शुक्रवारी पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. एकूण पाणी वापरात साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाणार आहे. सध्यस्थितीत, रोजचा पाण्याचा वापर 1650 दशलक्ष लिटर इतका आहे. त्यात 30 टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज सरासरी 1200 दशलक्ष लिटर पाणी वापर करावा लागणार आहे. त्यामुळे 450 दशलक्ष लिटर पाणी कमी घेण्यात येणार असल्याने काही भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे.

Latest News