मला विश्वास वाटत नाही की, मी मुख्यमंत्री म्हणून बोलतोय…

माझा श्रीकांत डॉक्टर झाला. पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधी निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. शिवसेना हेच माझं कुटूंब मानलं. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला. माझी मुलं माझ्यासमोर डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघेंनी आधार दिला. असे सांगत एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कशासाठी जगायचं. कुणासाठी जगायचं. असा प्रश्न उपस्थित झाला होता. माझ्या कुटूंबाला आवश्यकता होती. दिघे साहेब पाच सहा वेळा माझ्या घरी आले. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही असं सांगितल. त्यावेळी दिघे साहेब म्हणाले, तुला दुसऱ्यांच्या डोळ्याचे अश्रु पुसावेच लागतील. मी दिघे साहेबांना देव मानतो.आनंद दिघेंच्या नेतृत्वात आम्ही पक्षाचं काम सुरू केल्याचं शिंदे म्हणाले. तरुण वयात मला शाखाप्रमुख पद मिळालं. यानंतर मी काम सुरू केलं. त्या वेळात डान्सबारचं प्रमाण खूप वाढलं होतं. त्यावेळी आम्ही डान्स बारविरोधात आंदोलन पुकारलं. 16 डान्सबार फोडणारा मी एकटा एकनाथ शिंदे होतो. त्यानंतरही माझ्या आयुष्यात अनेक घटना घडला. माझी दोन मुलं अपघातात मृत्यू पावली. मुलांबद्दल बोलताना एकनाथ शिंदे विधानभवनात भावुक झाले. दोन्ही मुलं गेल्यानंतर मी खचलो होतो, मात्र त्यावेळी आनंद दिघेंनी मला उभं केलं, असंही शिंदे यावेळी म्हणाले.आज विधानभवनात बहुमत चाचणी झाल्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची भाषणं झाली. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. एक एक करीत एकनाथ शिंदेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासह 40 आमदारांना दिलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

– मला विश्वास वाटत नाही की, मी मुख्यमंत्री म्हणून बोलतोय

– मतदानादिवशी मला जी वागणूक मिळाली त्याचे साक्षीदार इथले अनेकजण आहेत.

– सुनील प्रभूंनाही माहिती आहे की, माझं खच्चीकरण करण्यात आलं. मी शहीद झालो तरी चालेल पण मागे हटणार नाही.

– मी आमदारांना सांगितलं की, तुमची आमदारकी धोक्यात येणार नाही.

– माझ्याकडे चर्चेसाठी माणसं पाठवली, आणि इकडे पुतळे जाळायचे, माझं सदस्यत्व रद्द केलं.

– माझ्या घरावर दगड फेकायला अजून कुणी पैदा झालं नाही.

-मी 1997 ला नगरसेवक झालो पण त्याच्या 5 वर्षे आधीच झालो असतो. मी कधीही पदाची लालसा केली नाही.

– आमचे बाप काढलं, कुणी रेडा म्हणालं, कुणी वेश्या म्हणालं, आमच्यासोबत महिला आमदार होता.

– माझं काम केसरकर यांनी हलकं केलं, ते मीडियाशी बोलले.

– श्रीकांतला बाप म्हणून कधी वेळ देऊ शकलो नाही, शिवसेनेला कुटुंब मानलं.

Latest News