PUNE महापालिकेच्या उपायुक्त विजय लांडगे त्यांच्यासह पत्नीवर (ACB )गुन्हा दाखल…


पुणे : तब्बल एक कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमविल्या प्रकरणी पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) गुन्हा मंगळवारी (ता.५ जुलै) दाखल करण्यात आला आहे. उपायुक्तांच्या (Deputy Commissioner) घराची मंगळवारी सकाळपासून झाडाझडती सुरू आहे.लांडगे आणि त्यांच्या पत्नीने तब्बल एक कोटी २ लाख ६० हजार रुपयांची अपसंपदा जमवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने याची तपासणी केली असल्याने यात तथ्य असल्याचे आढळले. या प्रकरणी आज सकाळ पासून त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली असून अधिकारी तपास करत आहे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय भास्कर लांडगे (वय ४९) त्यांच्यासह त्यांच्या पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय ४३) पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांनी तक्रार दिली आहे
तब्बल ३१ टक्के अपसंपदा पत्नीच्या नावे जमा केल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक शीतल घोगरे करीत आहेत.