कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही.- इम्तियाज जलील

इम्तियाज जलील यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यात त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, न्यायालयात जाऊ असा इशारा त्यांनी दिला. एमआयएमसह अनेक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.जलील यांनी बोलावलेल्या बैठकीला एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेेस, काँग्रेस आणि इतर अनेक लहान-मोठ्या संघटनांनी हजेरी लावली होती. जगभरात औरंगाबाद शहराची विशेष ऐतिहासिक ओळख आहे. केवळ हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कोणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर होऊ देणार नाही, कायदेशीर लढाई लढण्याचा देखील आमचा निर्धार असल्याचं जलील म्हणाले.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. या निर्णयाचे पडसाद औरंगाबाद जिल्ह्यात उमटले. या नामांतरला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आणि एसआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी देखील विरोध केलापुढे बोलताना जलील म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला आमचा विरोध नाही. आम्ही त्यांचा आदर करतो, संभाजी महाराजांचं नाव द्यायचं असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. शिवसेनेकडून जाणिवपुर्वक शहराचं नामांतर केलं जात असून, हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,