मंत्रिमंडळात महत्त्वाचे खात्यासाठी रस्सीखेच….

eknath-fad

मुंबई : मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते आपल्याकडे राहण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळते. यासाठी मोठी चर्चाही होत असते. भाजपकडे येणारे अर्थ व महसूल खात कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना दिले जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या वाट्याला २७ तर शिंदे गटाच्या वाट्याला १४ मंत्रिपद येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे नगरविकास, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हे खात जाणार असल्याची माहिती आहे. तसेच भाजपकडे गृह, अर्थ व महसूल खात जाणार असल्याचे समजते. यातही गृह खात हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडेच ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
. महाविकास आघाडीचे सरकार पडताच ३० जून रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या दोघांनीच शपथ घेतली. तेव्हापासून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच खातेवाटपाची घोषणा करणार असल्याचे म्हटले होते. अशात महत्त्वाचे खातेवाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितले होते. यानंतर ते मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुंबईला निघाले आहे. मंत्रिमंडळ वाटपाबाबत चर्चा होण्यापूर्वी मला आणि फडणवीसांना थोडा वेळ लागेल, असे सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.

Latest News