काँग्रेसचे 9 आमदारांना नोटीस…

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे, या पार्श्वभूमिवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत पोहचले आहेत. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावण्यात आली असून यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.

विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली होती. यावेळी काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार यांना सभाग्रहात पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांना बाहेर लॉबीतच थांबून राहावे लागले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे, याचा आढावा घेण्यात आला

. काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. दोन जण पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते.काल कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहून कॉंग्रेसच्या काही आणदारांवर करवाई करण्याची मागणी केली होती, विधान परिषदेच्या निवडणूकीत हंडोरे यांच्यासाठी ठरलेला मतांचा कोट्याची मते त्यांना मिळाली नव्हीते त्यामुळे पक्षाचा आदेश न मानणाऱ्या आमदारांवार कारवाईची मागणी केली जात आहे.

Latest News