पुणे जिल्हा सोनोग्राफीचे सेंटरचालक चिकित्सकासह तिघांना लाच घेताना तिघांना अटक…

पुणे : (. ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )कुंपणच शेत खाते आणि लाखो रुपयांचा पगार सरकार देत असूनही सरकारी कर्मचाऱ्यांचे काही केल्या पोट भरत नाही. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला लाचखोरीचा हा धंदा बिनधास्तपणे सुरू आहे. दररोज कोणी ना कोणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकतो, मात्र तरी देखील पुढच्याच ठेच मागचा शहाणा.. या म्हणीप्रमाणे शहाणा होतच नाही. कारण त्याला माहित आहे की, सापडेल तोच चोर! बाकी सगळे साव! आणि पुन्हा सहा महिन्यानंतर फुल पगार सुरू! जरा इमोशनल झाले की, फंदफितुरीमध्ये कोर्टामध्ये सुटका आणि बऱ्यापैकी लाचखोरीची प्रकरणे निकाली निघतच नाहीत. अशा भूमिकेत मग आपण पैसे का सोडायचे?काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून औंध जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी महादेव बाजीराव गिरी, जिल्हा शलचिकित्सक डॉ. माधव बापूराव कणकवळे, जिल्हा रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक संजय सिताराम कडाळे या तिघांना 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.गेल्या चार-पाच वर्षापासून सोनोग्राफीचे सेंटरचालक कुजबूज करत होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून सोनोग्राफी सेंटरच्या नव्या परवानगीसाठी पैसे द्यावे लागतात ही चर्चा सुरू होती.मात्र या संदर्भात उघडपणे बोलण्यास कोणी तयार नव्हते. शिरूर तालुक्यातील एका सोनोग्राफी सेंटर चालकाने मात्र धाडस केले आणि काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा शल्य चिकित्सकासह तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडून जेरबंद केले.ही लाच महादेव गिरी व डॉ. माधव कणकवळे यांनी संगनमताने संजय कडाळे यांच्यामार्फत स्वीकारली. कडाळे याला लाथ स्वीकारताना गुन्हा दाखल करण्यात आला. रंगेहाथ पकडण्यात आले व तिघांना अटक करण्यात आली.जिल्हा रुग्णालयातील औंध छावणी परिसराकडून सोनोग्राफी सेंटरची प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणाचा परवाना दिला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परवान्यासाठी सातत्याने पुणे जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर चालकांची छळवणूक केली जाते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. मात्र या अधिकाऱ्यांचा बिनधास्तपणा एवढा वाढला की, उघड उघड लाच मागण्यात त्यांना कोणतीच लाज वाटेनाशी झाली.शेवटी शिक्रापूर येथील एका सोनोग्राफी सेंटर चालकाने प्रमाणपत्राच्या नोंदणी करण्याचा परवाना मागण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्याला लाच मागितली. तो वैतागून गेला. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली, तेव्हा ही लाच मागण्यात आली आहे असे निदर्शनास आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा जुलै रोजी सापळा रचला.४० हजार रुपयांची मागितलेली लाच व तडजोडीने बारा हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना संजय कडाळे याला लाच लचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या पुढील तपास लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.