जालन्याच्या सरस्वती भुवन शाळेच्या १९७१ बॅच ( मॅट्रिक ) एस.एस.सी विद्यार्थ्यांचे पुणे येथे संमेलन संपन्न

*जालन्याच्या सरस्वती भुवन शाळेच्या १९७१ बॅच ( मॅट्रिक ) एस.एस.सी विद्यार्थ्यांचे पुणे येथे संमेलन संपन्न

*शाळेच्या जगात रमले सवंगडी*पुणे -(प्रतिनिधी)कडक शिस्त,अभ्यासाचा तास,वर्गात शिक्षक अनुपस्थित असतांना केलेला धिंगाणा,शाळेची घंटा झाल्यावर अतिशय उत्साहाने घराकडे वळणारी पावले अशा जालन्याच्या सरस्वती भुवन शाळेच्या पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणीने एकत्रीकरण कार्यक्रम खूप रंगला.सरस्वती भुवन जालन्याच्या १९७१ बॅच च्या ११ वी (मॅट्रिक) च्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंबेगाव येथील *प्रतिकृती लेक व्ह्यू रिसॉर्ट* मध्ये १८-१९ जून रोजी निवडक विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे एकत्रीकरण व स्नेहभोजन कार्यक्रम आयोजिला होता

. सर्वांनी कॅरम,बुद्धिबळ,टेबल टेनिस खेळून आनंद व्यक्त केला.सुरुवातीला कुटुंबियांचा परिचय झाला.शालेय जीवनातील जुन्या आठवणी सांगितल्या गेल्या. रेन – डान्स चा पण सर्वांनी आनंद घेतला.सखाराम देशपांडे,सीमा भावे,विनायक मेहेंदळे,ऍड सुनील किनगावकर,पद्मा पांगारकर यांनी ह्या मैत्रीपूर्ण संस्मरणीय *अनुभव सोहळा* यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला

.संजीवन पाटणकर,अविनाश पाठक सुभाष काळे,विनायक मेहेंदळे,अशोक आगलावे,विनायक साखरे सखाराम देशपांडे,बाळकृष्ण देशपांडे,सुनील किनगावकर,लक्ष्मीकांत बळद,सीमा भावे सौ संध्या बळद, सौ चंचल काळे ,सौ विजया पाटणकर,सौ तृप्ता मेहेंदळे सौ विमल आगलावे,शुभांगी अग्निहोत्री,आरती केतकर,पद्मा पांगारकर,अनुजा कुलकर्णी, जयश्री देशपांडे,सौ मेघा किनगावकर,सौ तनुजा देशपांडे ह्यांनी ह्या आनंदी सोहळ्यात सहभाग नोंदवला

.अनेक वर्षांनी शाळेतले आपले सवंगडी सहकुटुंब समोर आले आणि एकमेकांमध्ये झालेले बदल हाच एक मोठा चर्चेचा,विनोदाचा आणि गप्पांचा विषय झाला. ऍड सुनील किनगावकर लिखित *हास्यरंग* पुस्तकाचे वितरण करण्यात आले.एकमेकांचे सुख दुःख जाणून घेतांना आपण आयुष्यात किती काय काय केले याची प्रचिती झाली.सर्वांनी एकत्र बसून सहकुटुंब जेवण घेतले आणि केकही कापला त्यावर *ऋणानुबंध* असे सार्थक नाव पण लिहिले होते.यापुढे अधिकाधिक जालन्याच्या सरस्वती भुवन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना संपर्क करून अजून कार्यक्रम करण्याचा संकल्प करण्यात आला
.*कार्यक्रमाची क्षणचित्रे* फोटो ओळ*समूह छायाचित्र* -उभे असलेले डावीकडूनसंजीवन पाटणकर,अविनाश पाठक, सुभाष काळे,विनायक मेहेंदळे,अशोक आगलावे,विनायक साखरे,सखाराम देशपांडे, बाळकृष्ण देशपांडे,सुनील किनगावकर,लक्ष्मीकांत बळद*खुर्च्या वर बसलेल्या डावीकडून*सीमा भावे,सौ संध्या बळद, सौ चंचल काळे,सौ तृप्ता मेहेंदळे,सौ विजया पाटणकर,सौ विमल आगलावे,शुभांगी अग्निहोत्री,आरती केतकर,पद्मा पांगारकर,अनुजा कुलकर्णी,सौ जयश्री देशपांडे, सौ मेघा किनगावकर,सौ तनुजा देशपांडे

Latest News