१५ जुलै रोजी ‘ गुरू स्पर्श ‘ कार्यक्रमाचे आयोजन – ‘ भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

१५ जुलै रोजी ‘ गुरू स्पर्श ‘ कार्यक्रमाचे आयोजन
——————————– ‘
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून ‘ गुरू स्पर्श ‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.गायन तसेच सरोद व तबला जुगलबंदीतून गुरूंना वंदन करण्यात येणार आहे. गायिका उर्वशी शहा, तबलावादक रामदास पळसुले, सरोदवादक पं. पार्थो सारथी आणि हार्मोनिअम वादक सौमित्र क्षीरसागर हे सहभागी होणार आहेत.

  हा कार्यक्रम शुक्रवार, १५ जुलै रोजी २०२२ रोजी सायंकाळी सव्वा सहा  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १२९ वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

Latest News