पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपये स्वस्त,मुख्यमंत्री शिंदे सरकारचा निर्णय,


मुंबई प्रतिनिधी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यांत कॅबिनेटपदाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेतठाकरे सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात आला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सध्या राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपयाने स्वस्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी केली आहेआजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारनं मोठा दिलासा दिला आहे
नगराध्यक्ष आणि संरपचाची निवड आता थेट नागरिकांमधून करण्याचा महत्त्वाचा निर्णयही आज घेण्यात आला. आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
तसेच मेट्रो (Metro) ट्रेनलाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन योजनेच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र टप्पा-2 राज्यात राबवणार आहे. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान टप्पा दोन हे अभियानही राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं
.