चित्राताई पदाचा राजीनामा द्या, आणि रस्त्यावर ची लढाई लढा :शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे

नागपूर- (. ऑनलाइन परिवर्तनाचा सामना ) –

संजय राठोड यांना चप्पल मारायची भाषा करायचे आता तर त्यांनी पहिल्या रांगेत बसून शपथ घेतली. लढा चालू ठेवणार, असं त्या चित्राताई वाघ म्हणाल्या मात्र एका तलवारीला २ म्यान कसे असतील? त्यांनी पदाधिकारी पदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर लढाई लढली पाहिजे.असा मत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले

भंडारा- गोंदिया, मावळ आणि भद्रावती येथील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकार गलथानपणा करीत आहे. गेले तीन दिवस मी नागपूर, भंडारा, गोंदिया दौऱ्यावर होते. मनीषा कायंदे ह्या देखील सोबत होत्या. आम्हाला पीडितेला किंवा तिच्या कुटुंबियांनाही भेटू दिले नाही, असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला

३० तारखेला पीडित महिला भावाच्या घरी जात होती. तिला खायला अन्न मिळत नाही, जाण्यासाठी तिने लिफ्ट मागितली, त्यावेळी ही घटना घडली. त्या महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी श्रीराम उर्कुडे नामक आरोपी अजूनही फरार आहे.

या सगळ्या प्रकरणामध्ये सत्य मांडणे गरजेचे आहे. ३१ तारखेला ती महिला एका ब्रिजखाली सापडली. तिथे एका महिलेने त्यांना पोलिस स्टेशन मध्ये आणलं होतं. पण ती महिला खाण्याच्या शोधात ती स्टेशन मधून बाहेर पडली आणि १ तारखेला ती महिला एका ढाब्यावर थांबली असताना अमित सार्वे, नाजिद अन्सारी या दोघांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केले, असे सुषमा अंधारे म्हणाल्या

 

.आपण महिलांचे कैवारी आहोत, असे भाजपने हे सांगून टाकले. पण आरोपी ताब्यात नाही. मग फास्ट ट्रॅक कोर्टात कोणाला सामील करणार, असा सवालही त्यांनी केला. भंडारा जिल्ह्यात ७ दिवस एसपीच नव्हते. इतके दिवस एस पी नव्हते कारण आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे काही धंदे तिथे चालत होते. त्याला अटकाव केल्यामुळे तिथल्या आधीच्या एसपींची बदली झाली. भोंडेकर एकनाथ शिंदे या गटात सामील झालेले आहेत. ते विमान थांबवू शकतात, तर त्यांना माहीत नाही का की जिल्ह्याला एसपी पाहिजे, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला

. त्यांच्याकडे अशी वॉशिंग मशीन आहे की, त्यामध्ये एका बाजूने बलात्कारी, भ्रष्टाचारी टाकला की दुसऱ्या बाजूने तो शुद्ध होऊन निघतो, असा जबर टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

अब्दुल सत्तार सारखा माणूस त्यात टाकला की, तोसुद्धा हिंदुत्वाची भाषा करायला लागतो, असेही त्या म्हणाल्या.भंडारा येथील पीडितेला शिवसेना पक्षाकडून २ लाख रुपये मदत द्यायचं ठरवलं, मात्र तिथे आम्हाला ही मदत द्यायला आम्हाला पोलिसांनी अडवलं. संदीप पाटील आम्हाला म्हणाले अशी काही ऑर्डर नाही, तिथे असलेले एस.पी. म्हणाले मला तर माहीतच नाही, गृहमंत्री नाहीच मग न भेटण्याची ऑर्डर दिली कोणी, या प्रश्‍नाचे उत्तरही कुणाकडे नाही. हा श्रीराम उरकुडे आहे कोण? यात काय षड्यंत्र आहे, हे तपासले गेले पाहिजे. गोंदियात एक वेगळं प्रकरण समोर आलं. तिथे एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केले आणि गर्भपात करण्यास सांगितले आता ती मृत्यूशी झुंज देते आहे. आता आरोग्य मंत्री नसल्यामुळे आयपिल देण्याचे काम करण्याच्या परवान्याबद्दल विचारायचे कोणाला? एकही महिला मंत्री नाही मग सांगायचे कोणाला? किमान पंकजा मुंडे यांना तरी घ्यायला पाहिजे होतो. पण तो त्यांचा प्रश्‍न आहे. पण या विस्तारात एक तरी महिला मंत्री असायला हवी होती, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले

.अशा वातावरणात मानव्याच्या पातळीवर मदत स्वीकारू देत नाही, तिथल्या हेड कॉन्स्टेबल कोणाच्या फॉलो करतात.

Latest News