राज्यातल्या 5 कोटी मुली,महिला यांचं अस्तित्वच सरकार अमान्य करतय – शालिनी ठाकरे


मुंबई (. ऑनलाइन परिवर्तनाचा सामना ). – राज्य सरकार महिलांना ‘दुय्यम’ वागणूक देत आहे. पण ही दुय्यम वागणूक नव्हे! राज्यातल्या 5 कोटी मुली, महिला यांचं अस्तित्वच हे सरकार अमान्य करत आहे, अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन साधला आहें
‘महाराष्ट्रात शिवसेना बंडखोर गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होऊन 39 दिवस उलटल्यानंतर अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एकही महिला मंत्री नाही.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या समर्थनाने राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मात्र मंत्रिमंडळ विस्तार ३९ दिवस रखडला होता.अखेर तो काल (ता.९ ऑगस्ट) पार पडला
मात्र या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान न दिल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या जवळ असलेला पक्ष मनसेकडूनही आता यामुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. यावर आता शिंदे गट किंवा भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते हे बघावे लागणार आहे.
शिवसेनेसोबत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४० बंडखोर आमदारांच्या साथीने आणि भाजपच्या समर्थनाने राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. मात्र, मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी या सरकारला ३९ दिवस लागले. यामुळे या सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. यामुळे सरकारवर मोठा दबाव वाढला होता
.दरम्यान, नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही.