ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर…

ऑनलाइन परिवर्तनाचा सामना – निवडणुका होणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायती आदिवासी भागातील आहेत. तालुक्यातील जानेवारी २१ ते सप्टेंबर २२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ३८ ग्रामपंचायतीं असून या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर झाले असून मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीं पुढील प्रमाणे : मढ, खुबी, कोपरे, तळेरान, सितेवाडी, घाटघर, अजनावळे, जळवंडी, उंडेखडक, राजुर, पूर, अंबोली, आपटाळे, खानगाव, घंगाळदरे, तांबे, मांडवे, पिंपळगावजोगा, पारगाव तर्फे मढ, देवळे, हडसर, गोद्रे,उच्छिल, तेजुर, इंगळून, भिवाडे बुद्रुक, सोनावळे, सुराळे, कोल्हेवाडी, चिल्हेवाडी, माणिकडोह, काळवाडी, दातखिळेवाडी, उंब्रज नंबर २, येणेरे, विठ्ठलवाडी, मंगरूळ, झापवाडी. निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार जुन्नर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार असून, सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असल्याचे तहसीलदा रवींद्र सबनीस व नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी सांगितले.यात नव्याने स्थापित झालेल्या झाप व विठ्ठलवाडी दोन ग्रामपंचायती आहेतसुप्रीम कोर्टाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. निवडणूक काळात या भागात जर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती झाली तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील –

१८ ऑगस्ट – निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल

२४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर – नामनिर्देशपत्रे दाखल करता येतील

२७, २८, ३१ ऑगस्ट – शासकीय सुट्ट्या असल्यानं अर्ज दाखल करता येणार नाहीत

२ सप्टेंबर – अर्जांची छाननी

६ सप्टेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) – अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

१८ सप्टेंबर – मतदान होईल (स. ७.३० ते सायं. ५.३०)

१९ सप्टेंबर – मतमोजणी

Latest News