सरकार बारा नव्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवणार, जुनी यादी रद्द समजावी असं पत्र ..


मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ). – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दोन महिने उलटली. काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. आता चर्चा विधान परिषदेच्या त्या १२ नावांच्या यादीची सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते, त्यावेळी शिंदे-फडणवीस सरकार आता १२ नव्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे. जुनी यादी रद्द समजावी असं पत्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे
. महविकास आघडी सरकारने २०२० मध्ये नाव पाठवली होती, पण राज्यपालांनी ती नाव मंजूर न केल्याने विधान परिषदेतील बारा जागा रिक्त आहेत.आता या १२ जागांवर नवी नावे सुचवण्यात येणार आहेत. जुन्या नावांची यादी रद्द समजावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज भवनला पाठवले आहे. या नावांवर अंतिम चर्चा झाली आहे
. महाविकास आघाडीची रखडलेली 12 नावे राज्यपाल आता कशी स्विकारणार याचीच जास्त चर्चा सुरु आहे.गेल्या अडीच वर्षात राज्यपाल आणि महाविकास आघाडीत राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून सतत खटके उडत होते. राज्यात सत्तातर झाल्यानंतर हे चित्र काहीस बदल असल्याचे चित्र आहे.
शिंदे – फडणवीस सरकार आता नव्या 12 नावांची यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे जुन्या नावांची यादी रद्द समजावी असे पत्र मुख्यमंत्री नी राज भवनला पाठवले आहे. त्यामुळे आता त्या यादीच काय होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.शिंदे-फडणवीसांकडे १२ नावांसाठी कितीतरी पटीने इच्छुकांची संख्या आहे. या १२ नावांसाठी अनेक नेत्यांनी लॅाबिंग देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता या यादीत कोणाचा समावेश होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ नावांची यादी राज्यपाल यांना दिली होती. मात्र, राज्यपाल यांनी अजूनही त्या यादीला मंजूरी दिलेली नाही. आता नव्या सरकारमुळे पुन्हा ती यादी चर्चेत आली आहे. आता शिंदे – फडणवीस पक्षातील कोणत्या नेत्यांना या 12 नावांच्या यादीत स्थान दिले जाईल याचा अंदाज आता लावला जात आहे