पिंपरी चिंचवड पत्रकार शहर पत्रकार संघातर्फे सदस्यांना “आरोग्य विमा” पॉलिसीचे वाटप!


पिंपरी चिंचवड पत्रकार शहर पत्रकार संघातर्फे सदस्यांना “आरोग्य विमा” पॉलिसीचे वाटप!
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना पोस्ट ऑफिसद्वारे सुरू करण्यात आलेली ” आरोग्य विमा पॉलिसी” योजना सुरू करण्यात आली.कार्ड धारकांना 10 लाखाचे विमा कवच दिले जाणार आहे. यावेळी सदस्यांना कार्ड वाटप करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव, वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, उपाध्यक्ष महेश मंगवडे, संजय बोरा,सरचिटणीस सुनील कांबळे,कार्यकारणी सदस्य सायली कुलकर्णी, कोषाध्यक्ष जितेंद्र गवळी, चिटणीस श्रद्धा कोतवाडेकर- कामथे,जिल्हा प्रतिनिधी गणेश शिंदे, कलिंदर शेख, कार्यकारणी सदस्य संतोष जराड, विनोद लोंढे, प्रीतम शहा, सदानंद रानडे, मुकुंद कदम,विश्वास शिंदे आदी उपस्थित होते.