नोरा फतेहीची तब्बल सहा तास चौकशी..

मुंबई ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्यासमवेत कसे संबंध होते आणि २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गैरव्यवहारात आपली भूमिका होती हे जॅकलीन हिला न्यायालयाला सांगावे लागणार आहे.: तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही हीची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) चौकशी केली आहे नोरा फतेही हीची काल (शुक्रवारी) चौथ्यांदा चौकशी करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसांनी नोराची कसून चौकशी केली. तिला 50 प्रश्न विचारण्यात आले होते. यात सुकेशकडून भेटवस्तू कधी घेतल्या? तू त्याला कुठे भेटली? असे काही प्रश्न होते. संपूर्ण चौकशीत नोराने पोलिसांना सहकार्य केल्याचे समजते.

याप्रकरणी तीन दिवसापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या हिला समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला २६ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पतियाळा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे

ईडीनं दाखल केलेल्याआरोपपत्रानंतर तिला समन्स बजावला आहे, आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव असल्याने न्यायालयाने समन्समध्ये म्हटलं आहे

.दोनशे कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आलिशान कारसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राचीही न्यायालयाने दखल घेतली आहे.

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिनला घोडा, मांजरी आणि दागिनेच भेट दिल्याचे आपल्याला माहिती आहे, पण सुकेश याने तिच्यासाठी श्रीलंकेत घरही खरेदी केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

सुकेशविरोधात खटला सुरू आहे.सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे आरोपी म्हणून नाव दिले आहे. याप्रकरणावर काही दिवसांपूर्वी जॅकलिनने मौन सोडले होते. ‘सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या सेलिब्रिटींना साक्षीदार बनवले आहे. तर मला आरोपी केले आहे

Latest News