भारतीय बुद्धिबळ संघाच्या प्रशिक्षकपदी भाग्यश्री ठिपसे

 
नवी दिल्ली :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

 रोमानिया येथे सुरू होत असलेल्या जागतिक युथ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी वूमन इंटरनॅशनल मास्टर (WIM)व अर्जुन पुरस्कार प्राप्त भाग्यश्री प्रवीण ठिपसे यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेला सोमवारी प्रारंभ झाला. रोमानिया येथे पाच ते सतरा सप्टेंबर या कालावधीत जागतिक युथ(अंडर १४, १६, १८ मुले-मुली) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीयसंघ सहभागी झालेला आहे. भारतीय महिला बुद्धिबळ संघाच्या प्रशिक्षकपदी भाग्यश्री ठिपसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून शामसुंदर यांची नियुक्तीझाली आहे. भारतीय महिला बुद्धिबळ संघात मैत्रिका मालिक, प्रागन्या,अनुपम श्रीकुमार, तनिषा बोरामणीकर, सुभी गुप्ता, दिव्या देशमुख, रक्षिता रवी, सुष्मिता भौमिक, भाग्यश्री पाटील, रिंधिया व्ही., कनिष्का एस.या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय पुरुष बुद्धिबळ संघात जॉन व्ही. अक्करकरन, गौरांग बागवे, इलमपार्थी ए. आर., प्रणेशएम., प्रणव व्ही,हर्षद एस.,सोहम कोमोत्रा यांची निवड झाली आहे. राखीव खेळाडू म्हणूनश्रीहरी एल. आर.,आनंद प्रणव यांचा समावेश आहे.

Latest News