भारतीय विद्या भवनमध्ये ११ सप्टेंबर रोजी ‘पाऊसवेळा’ कार्यक्रम भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


पुणे ःऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ पाऊसवेळा ‘ या पाऊसविषयक कविता,गायन आणि अभिवाचनाच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन रविवार, ११ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.
अनुराधा जोशी निर्मित या कार्यक्रमाचे संशोधन ,संहितालेखन डॉ वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले आहे. संगीतसंयोजन ,साथ संगत अनुप कुलथे यांची आहे ,केतकी देशपांडे गायन करणार आहेत तर अक्षय वाटवे,दीपाली दातार अभिवाचन करणार आहेत. काव्य वाचन,गायन ,अभिवाचन असा संगीतमय कार्यक्रम असणार आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १३८ वा कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.