आय.एम.ई.डी.जेम्स महोत्सव’ चे उदघाटन


‘आय.एम.ई.डी.जेम्स महोत्सव’ चे उदघाटन
पुणे :
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) मध्ये ‘आयएमईडी
जेम्स्-२०२२’ या तीन दिवसीय स्पर्धा महोत्सवाचे उदघाटन भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमइडी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते ६ सप्टेंबर रोजी सकाळी झाले. या स्पर्धा महोत्सवात १६ स्पर्धांचा समावेश असून ७०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
हा स्पर्धा महोत्सव दिनांक ६ ते ८ सप्टेंबर या दरम्यान आयएमईडी ( पौड रस्ता कॅम्पस, कोथरुड ) येथे होत आहे. महोत्सवातील सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक तसेच विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.
या स्पर्धा महोत्सवामध्ये देशभक्तीपर गीते स्पर्धा,ऍप चॅलेंज, ‘वक्तृत्व स्पर्धा’, ‘अॅड मॅड शो’, ‘डेव्हलपिंग वेबसाईट’, ‘टेक्नो इव्हेंट’, ‘मुक्त निर्मिती क्षमता’, ‘माझे चित्र ,माझी गोष्ट’, ‘रांगोळी’, ‘सर्वोत्तम व्यवस्थापक’, ‘सर्वात्तम उद्योजक’, प्रश्नमंजूषा ,भित्तिपत्रक निर्मिती या स्पर्धांचा समावेश आहे.