पिंपरी चिंचवड महानगरपालिका लोगोचा (Logo )ठेकेदार, कंत्राटी कर्मचाऱ्या कडून गैरवापर

pcmc-2

पिंपरी ( परिवर्तनाचा. सामना ).
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सभासद तथा नगरसेवक ओळखू यावे यासाठी पिंपरी महानगर पालिकेकडून नगरसेवकांना महानगर पालिकेचा लोगो (स्टीकर) देते.परंतु त्या लोगोचा वापर आज ठेकेदार, , खाजगी व्यक्तींकडून आणि नगरसेवकांच्या चेले चपाट्यांकडून लोगोचा वापर सर्रासपणे होताना दिसत आहे.

पिंपरी महानगर पालिकेसमोर होणा-या आंदोलने, मोर्चे दरम्यान सुरक्षारक्षकांनी गेटवर वाहने आडवू नये यासाठी मनपाकडून नगरसेवकाला दोन किंवा चार लोगो वाटप करण्यात येते. परंतु त्या लोगोचा वापर ठेकेदार, खाजगी व कार्यकर्ते करत असल्याचे निर्दशनास आले आहे.
हजारो लाखो रुपये खर्च करून लोगो छापण्यात आलेत, परंतु त्याचा दुरूपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या नगरसेवकाच्या नावावर वाहनच नाही अश्या लोकांनाही लोगो स्टीकर देण्यास नगरसेवकांकडून भाग पाडल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. काही तर या लोगोचा कोरोना काळात पुरेपूर फायदा उचलला आहे. तर काही नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी करून आठ आठ स्टीकर घेऊन गेले आहेत.
काही नगरसेवकांनी वाहनांचे काच फुटले म्हणून तर काहींनी खराब झाले,फाटले आहे म्हणून लोगो मागून चेले चपाटयांना वाटप केले आहे. याचच फायदा घेत पालिकेत वाहनावर ठेकेदार व कार्यकर्ते दिसत आहे. विशेष म्हणजे काहींनी टोल नाक्यावर सुध्दा याचा फायदा घेतला असल्याचे सांगितले जात आहे. काही ठेकेदाराची कर्मचारी या लोगोचा गैरवापर. करताना. दिसतात

खर्च महापालिकेचं शायनिंग मात्र कार्यकर्त्यांची, ठेकेदारांची ?

तरी आज वेगवेगळ्या वाहनांवर लोगो लावल्याचे दिसून येत असल्याने त्याची संख्या जास्त दिसून येत आहे.हे लोगो (स्टीकर) बाहेर छापले जात असल्याचे देखील बोलले जात असून ही गंभीर बाब आहे. पिंपरी महानगर पालिका आयुक्तांनी याची त्वरित दखल घेऊन लोगो स्टीकर वाटपाचे धोरण निश्चित करण्याची मागणी नागरिकांनीं केली आहे.
“लोगो स्टीकर देण्याची पध्दत “
नगरसेवकांनी त्यांच्या लेटर हेडवर लोगोची मागणी करायची असते, तर पालिकेकडून दोन फोर व्हीलर, दोन टू-व्हीलर साठी लोग दिले जाते, तर नगरसेवकांच्या नावार असलेली वाहनांची माहिती अथवा आरसीची प्रत द्यावी लागते. तसेच ज्या वाहनाला लोगो स्टीकर लावायचे आहे त्या वाहनांचे फोटो जोडणे आवश्यक आहे.’अधिक माहिती देण्यास चालढकल ‘ ” पिंपरी मनपा लोगो स्टिकर ज्या ज्या सभासदांना ५ वर्षात देण्यात आले आहे त्यांची नावांची यादी व त्यांना वाटप केलेल्या लोगोची संख्याची यादी तसेच वर्क ऑर्डर आणि लोऐस्टची
माहिती आणि किती लोगो प्रिंट झाले व वाटप कोणाला केले यांची माहिती मिळत. नाही नगरसेवकांचा कार्यकाळ संपला तर ते लोगो काढून घेण्याचे धोरणच नाही?

Latest News