जोपर्यंत चिन्हाचा निर्णय होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं धनुष्य बाण चिन्ह गोठवण्यात यावं…

नवी दिल्ली :. पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी झाली. दरम्यान, जोपर्यंत चिन्हाचा निर्णय होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.शिंदे गटाचे वकील अॅड. कौल यांनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेता येत नसल्याचे सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी सांगितले

सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याचा दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनापीठाकडे सुनावणी घेताना शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्या अशी मागणी शिंदे गटाचे वकील कौल यांनी केली. मात्र, त्यावर सर्वोच्चा न्यायालयाने कुठलेही मत व्यक्त केले नाही.

घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्चा न्यायालयाने दिले आहेत मंगळवारी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज हे प्रकरण घटनापीठा समोर आले. न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी शिंदे गटाचे वकील अॅड. नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून निवडणूक आयोग पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेईल. त्यानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले

.की, ज्यांच्या विधानसभा सदस्य अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे, त्यांना निवडणूक आयोगावर धाव घेण्याचा अधिकार नाही. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळाल्यास सगळेच व्यर्थ होईल, याकडे ही सिब्बल यांनी लक्ष वेधले. त्यावर कोणी आमदार असो किंवा नसो, तो पक्षावर दावा करू शकतो असे अॅड. कौल यांनी म्हटले.

Latest News