राष्ट्रपतीच्या खासगी सचिवपदी पुण्याच्या संपदा मेहता

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – आपल्या कुटुंबाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि प्रेरणेने तसेच स्व कौशल्याने संपदा या दहावी च्या परीक्षेत तसेच बारावीच्या परीक्षेत मेरीट मध्ये झळकल्या होत्या तेव्हा .मेहता संपदा सुरेश हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.त्यांचे वडील सुरेश मेहता हे व्यवसायाने सी ए आहेत ,तर काका विठ्ठल मेहता हे ड्रायव्हिंग स्कूल चालवितात

. या दोन्ही बंधूंचा पुण्याच्या समाजकारणात आपापल्या परीने मोठा सहभाग राहिला आहे. तेव्हाच संपदा यांनी आपल्या उद्दिष्टांची दिशा दर्शविली ज्यात त्या पूर्णतः यशस्वी झाल्या आहेत .बीकॉम मध्येही त्या मेरीट मध्ये झळकल्या .२००८ साली त्या आय ए एस महाराष्ट्र केडर मध्ये पहिल्या आल्या .

जळगाव ,नाशिक , गडचिरोली , मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी असिस्टंट कलेक्टर,डेप्युटी कलेक्टर,कलेक्टर अशा पदांवर तसेच महाराष्ट्रात जीएसटी प्रमुख संचालक पदावर काम केल्यावर त्यांची दिल्लीत जीएसटी संचालनालयात नेमणूक झाली

. काल त्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खाजगी सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याच्या कन्येची हि भरारी पुण्याला निश्चितच अभिमानास्पद असून आपल्या कुटुंबासह आपल्या शिक्षकवृंद आणि प्रोत्साहनदात्या प्रत्येकाला याबाबतचे श्रेय संपदा मेहता यांनी दिले आहे

.नवी दिल्ली/पुणे-पुणे येथील हुजूरपागा आणि स.प. महाविद्यालयात शिक्षण घेतलेली पुण्याच्या संपदा सुरेश मेहता यांच्याकडे काल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खाजगी सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे.

संपदा मेहता, IAS, यांचा अल्प परिचय:-

जन्म पुणे दिनांक १६ जानेवारी, १९८२.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण: – हुजूरपागा, पुणे -४११ ०३०.

महाविद्यालयीन शिक्षण: – सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे -४११ ०३०.

इयत्ता दहावी – पुणे विभागात गुणवत्ता यादीत.
इयत्ता बारावी – वाणिज्य शाखा – पुणे विभाग सर्व प्रथम.
सनदी लेखापाल अभ्यासक्रम – सुरेश के मेहता आणि कंपनी, पुणे.

परीक्षा उत्तीर्ण २००४-CA Final.

सन २००६- UPSC- पहिल्यांदा निवड केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग – Central Excise, गाझियाबाद येथे एक वर्ष.

सन २००७-UPSC- दुसऱ्यांदा निवड- आयकर विभाग- नागपूर.

सन २००८-UPSC- तिसऱ्यांदा निवड- भारतीय प्रशासन सेवा -IAS- महाराष्ट्र राज्य स्तरावर प्रथम क्रमांक.
मसुरी येथे एक वर्षाचे प्रशिक्षण.

२००९ – महाराष्ट्र राज्य सेवेत IAS अधिकारी म्हणून रुजू
नंतर
१. जळगाव जिल्हा उपजिल्हाधिकारी,
२.नाशिक – आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी,
३. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषद – मुख्य कार्यकारी अधिकारी,
४. नंतर पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि कृषी कार्यालयात विवीध पदांची जबाबदारी,
५.‌व्यवस्थापकीय संचालक – हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई,
६. जिल्हाधिकारी, मुख्य मुंबई,
७. नंतर वस्तू आणि सेवा कर विभाग – सहसंचालक, मुंबई,
८. नंतर संचालक, राजस्व विभाग, केंद्रीय अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली.
९. आताची नियुक्ती – मा. महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या खाजगी सचिवपदी ११ सप्टेंबर रोजी नियुक्ती.

स्काऊट गाईड समभाग आणि प्रशासकीय प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेश दौरे.

पती श्री रणजीत कुमार, IAS-2008 – महाराष्ट्र राज्य.

सध्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग, उत्तर प्रभाग, ( Department of Personnel and Training, New Delhi, North block ) येथे सहसचिव (Joint Secretary) या पदावर कार्यरत.

मुलगा चि ॐ आणि मुलगी – कु. अन्विका- प्राथमिक शिक्षण नवी दिल्ली येथे.

Latest News