सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात आलेली नाही- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात खटला दाखल असताना, सरन्यायाधीशांच्या सत्कारप्रसंगी तेही व्यासपीठावर होते. ही बाब सयुक्तिक नसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले होतेत्या संदर्भात बोलताना बावनकुळे यांनी टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही अवस्था त्यांच्या पक्षात केविलवाणी असताना त्यांनी गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. सरकारकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी रद्द करण्यात आलेली नाही. त्या संदर्भात चर्चाही झालेली नसल्याचेही बावनकुळे म्हणाले.पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. त्या अजिबात नाराज नाहीत. त्यांच्याशी रोजचा संपर्क आहे. त्यांनी नाराजी व्यक्त करणारे कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे कट्टर नेते असून, जेथे काँग्रेस चुकते त्या ठिकाणी ते टीका करीत आहेत. माजी मुख्यमंत्री असतानाही त्यांना काँग्रेसमधून डावलले जात आहे. ते भाजपच्या संपर्कात नाहीत, तसेच ज्यांना भाजपत यायचे आहे, त्यांना पक्ष मजबुतीसाठी प्रवेश दिला जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.नाशिक सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व्यासपीठावर असणे सयुक्तिक नसल्याची टीका ज्यांनी केली, ‘ते’ सत्ता निघून गेल्यामुळे बावचळले आहेत, अशी टीका करून त्यांनी न्यायालयाच्या नि:पक्षपणावर टीका केली आहे. यातून त्यांच्याच पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची टीका भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Latest News