वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सोडायला कारणीभूत जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद


पुणे (वाबळेवाडी) : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील तब्बल २१२ विद्यार्थ्यांना शाळा सोडायला लागले आहे. याला कारणीभूत केवळ पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ असून त्यांची गेल्या वर्षभरातील कामकाजाची आणि त्यांचे फोनकॉल डिटेल्सची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाबळेवाडी ग्रामस्थांनी थेट आएएएस अधिका-यांच्या नियुक्त्या करणा-या कर्मिक प्रशिक्षण विभागाकडे केली आहे. विविध नऊ मुद्द्यांच्या आधारावर, गेल्या वर्षभरातील पूराव्यांसह सदर मागणीचे तक्रारपत्र कर्मिक प्रशिक्षण विभाग कार्यालयासह, पंतप्रधान कार्यालय आणि संबंधित १० ठिकाणी मेलद्वारे आणि कुरियरने पाठविल्याची माहिती वाबळेवाडी ग्रामस्थांनी दिली
– १७ जुलै २०२१ पासून वाबळेवाडीला केवळ वृत्तपत्रातील एका बातमीच्या आधारावर लक्ष्य केल्याचा ठपका वाबळेवाडीकरांनी थेट सीईओ आयुष प्रसाद यांच्यावर ठेवला आहे.
आता प्रसाद यांच्या विरोधात पालक ठराव घेवून, तो पुढील आठवड्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे.
या घडामोडींनंतर सीईओंनी केंद्रप्रमुख वंदना शिंदे यांना मध्यस्थी घालून, मुख्याध्यापकांकरवी बैठकीचे निमंत्रण ग्रामस्थांना दिले होते.
मात्र, आत्तापर्यंत शाळेत कधीच आले नाही, मग आता कशाला मिटींग ? म्हणून ग्रामस्थांनी आपला मोर्चा थेट सीईओ यांची नियुक्ती करणा-या केंद्र सरकारच्या कर्मिक एवं प्रशिक्षण विभागा यांच्याकडे वळविला. गेल्या वर्षभरातील सीईओंच्या कार्यशैलीमुळे शाळेतून २१२ विद्यार्थी शाळा सोडून गेल्याचा दोष त्यांच्यावर दाखवत, त्यांना या पुढे देशातील कुठल्याच जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून नेमणूक देवू नये, अशी तक्रार केली
९ मुद्द्यांचा आधार घेवून त्यानुसार पुरावे ग्रामस्थांनी सादर केले आहेत. ही सर्व माहिती त्यांनी कर्मिक प्रशिक्षण विभागसह थेट पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मनुष्यबळ विभाग, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव, ग्रामविकास व शिक्षण मंत्री कार्यालय, शिक्षण आयुक्त, विभागिय आयुक्त यांना मेलद्वारे व प्रत्यक्षप्रत कुरियर मार्फत पाठविल्याचे ग्रामस्थ प्रकाश वाबळे, खंडू वाबळे, जालिंदर वाबळे यांनी सांगितले
आहे.पुणे जिल्हा परिषदेत दाखल झाल्यावर जगाच्या पातळीवर चमकलेल्या वाबळेवाडी शाळेत एकदाही न फिरकलेल्या, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची चौकशी व्हावी. तसेच त्यांना यापुढे देशातील कुठल्याच जिल्हा परिषदेत सीईओ करु नये, अशी मागणी व तक्रार वाबळेवाडी ग्रामस्थांनी थेट आयएएस अधिका-यांची नियुक्ती-नेमणूक करणा-या केंद्र सरकारच्या कर्मिक एवं प्रशिक्षण विभागाकडेस्थानिक स्वराज्य संस्थेने कुठलाही ठराव घेतला तरी त्याची अंमलबजावणी व्यवहार्य असण्याची तपासणी, सचिव म्हणून संबंधित प्रशासकीय अधिका-याने करावी लागते. राज्यातील अनेकजण येऊन गेलेल्या वाबळेवाडीत, कधीच न फिरकलेल्या सीईओंनी परस्पर व ग्रामस्थांनी न बोलता शाळेची केलेली चौकशी आणि कारवाई ही शाळेची बदनामी करणारी आहे. यामुळे सीईओंकडे प्रशासकीय कौशल्य नसल्याचे सिध्द होते. त्याबद्दलचे वास्तव पुरावे आम्ही अर्जात दिल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेखा वाबळे, भारती वाबळे यांनी सांगितले असून, गेली वर्षभर चौकशीकेल्यानंतर दोषी कोण ते सीईओंनी आता जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.लोकवर्गणी काढता म्हणून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देणा-या सीईओंच्या विरोधात आता अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार असून, आमची शाळा बंद करण्याच्या षडयंत्राचा पूर्ण पर्दाफाश केल्याशिवाय, आम्ही आता गप्प बसणार नसल्याचे माजी सरपंच केशवराव वाबळे, सतीश कोठावळे, सतीश वाबळे, गणेश वाबळे यांनी सांगितले.