अर्जुन पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय टेनिस पटू अंकिता रैना हिच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण


गिरीजा शंकर विहार सोसायटी
कर्वेनगर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात
अर्जुन पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय टेनिस पटू अंकिता रैना हिच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण
पुणे
(प्रतिनिधी)
कर्वेनगर येथील गिरीजा शंकर विहार सोसायटी मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला.सात दिवसांच्या ह्या महोत्सवात प्रवचन,भावभक्तीरंग मैफिल असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
प्रसिद्ध संगीतकार अविनाश – विश्वजीत यांचा ऋषीकेश रानडे यांच्याबरोबर “प्रवास” हा सांगीतिक कार्यक्रम संपन्न झाला.हिंदी मराठी गीतांचा ऑर्केष्ट्रा व अनेक मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले.मुलांसाठी विविध स्पर्द्धा व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.गिरीजा शंकर विहार सोसायटी तील रहिवाशी अर्जुन पुरस्कारप्राप्त व आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अंकिता रैना हीचा सत्कार सोसायटी च्या वतीने पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच अंकिता रैना हिच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण दिघे हे होते तर प्रमुख पाहुणे जेष्ठ नागरिक मंच चे राजेंद्र सिंग हे होते.
कार्यक्रमास गिरीजा शंकर विहार सोसायटीचे नागरिक,महिला मोठ्या संख्येने सर्व कार्यक्रमात सहभागी झाले होते.