नॅनो स्ट्रक्चर्ड मटेरियल्स फॉर एनर्जी अॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट ‘भारती विद्यापीठाच्या चर्चासत्राचे उदघाटन

‘नॅनो स्ट्रक्चर्ड मटेरियल्स फॉर एनर्जी अॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट ‘
भारती विद्यापीठाच्या चर्चासत्राचे उदघाटन

पुणे :

‘नॅनो स्ट्रक्चर्ड मटेरियल्स फॉर एनर्जी अॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट ‘ या विषयावर

भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय चर्चासत्राचे सोमवारी उद्घाटन झाले. महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष , माजी कुलगुरू पद्मश्री डॉ.जी.डी. यादव , भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विदुला सोहोनी, डॉ. सुनीता जाधव, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. सुधीर अरबुज यांच्या उपस्थितीत सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी झाले.

उद्घाटनानंतरच्या सत्रात डॉ.एस.एच. पवार, डॉ. भारत काळे, डॉ.संखदीप दास, राजेंद्र शर्मा या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

डॉ. यादव म्हणाले, ‘ औद्योगिक वाढीचा वेग फारसा नसतानाही भारतात मागील वर्षी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढले, ही चिंतेची बाब असून तापमान वाढ रोखण्यासाठी हे उत्सर्जन २५ गीगा टनने कमी करण्याची गरज आहे. भारत ही कार्बनवर आधारित अर्थव्यवस्था असली तरी उर्जेसाठी अन्य स्त्रोत शोधण्याची गरज आहे. २०५० साली भारताला ४९ हजार टेरा वॅट अवर्स इतकी उर्जा लागेल, त्यासाठी नॅनो मटेरियल उपयुक्त स्रोत ठरेल. पर्यावरण संवर्धनाचा उद्देशही त्यातून साध्य होईल. महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सचे सचिव डॉ.बी.बी. काळे यांनी ही मार्गदर्शन केले.

‘ शाश्वत विकासासाठी पर्यायी उर्जास्रोत ही भारताची गरज आहे. रोजगार निर्मितीसाठी ही त्याचा उपयोग व्हावा , अशी अपेक्षा डॉ.माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केली.

Latest News